खजूर आरोग्यासाठी चांगला असतो. दिवसातून किमान चार खजूर खावेत, असे कुणी, कधीतरी आपल्याला सांगितलं आहे. पण खजूर खाण्याचे नेमके फायदे काय आहेत, याबाबत आपल्याला माहिती असते असं नाही. हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी खजूर खाणे चांगले असते किंवा आरोग्याच्या समस्यांवर उपाय म्हणूनही दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा, असे घरातील व्यक्तींकडून सांगितलं जातं. पण आपण बऱ्याचदा त्याकडे दुर्लक्ष करतो. खजुरामध्ये ‘अ’ आणि ‘क’ जीवनसत्व असते. ते आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असते. याशिवाय खनिज, ऊर्जा मिळण्यासाठी आणि रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित राखण्यासाठी खजुराचा उपयोग होतो. मात्र खजुराचे असेही काही फायदे आहेत जे आपल्याला माहिती नसतात. खजुरामुळे त्वचा नितळ आणि केस मजबूत होण्यास मदत होते. जाणून घ्या, फायदे…

१. त्वचा नितळ राहण्यास मदत

drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
Is blackcurrant and chia seed water really beneficial for health Get expert advice l काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
काळ्या मनुक्यांचे आणि चिया सीड्सचे पाणी आरोग्यासाठी खरंच फायदेशीर आहे का? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
Bananas and Curd
केळी आणि दह्याचे एकत्रित सेवन लैंगिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरते का? जाणून घ्या, तज्ज्ञ काय सांगतात
Healthy Foods for Your Liver
लिव्हर खराब होण्याचा धोका वाटतोय? लिव्हरमधील फॅट्स झपाट्याने काढून टाकतात ‘हे’ आठ पदार्थ? सेवनाची पद्धत घ्या समजून…
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत
Health centers should be capable of diagnosing cancer
‘कर्करोग निदानासाठी आरोग्य केंद्रे सक्षम हवीत’
Boiled Ajwain Water Benefits
रात्री झोपण्यापूर्वी ओव्याचे पाणी पिण्याचे अमृतासमान फायदे; पाहा शरीरात कोणते बदल होतात? 

दैनंदिन आहारात खजुराचा समावेश केल्यास त्वचा नितळ होते. चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत नाहीत. चेहऱ्यावरील ताण आणि अकाली आलेले वृद्धत्व लपविण्याचे काम खजुरामुळे होते. तुम्ही दिर्घकाळ तरुण दिसता.

२. चेहऱ्यावरील चट्ट्यांसाठी उपाय

काहींच्या चेहऱ्यावर डाग किंवा चट्टे असतात. खजुरामध्ये असणाऱ्या ब जीवनसत्वामुळे चेहऱ्यावरील चट्टे कमी होण्यास मदत होते. खजूर खाण्याबरोबरच खजूर आणि मधाचे मिश्रण चेहऱ्यावर लावल्याने हे डाग कमी होण्यास मदत होते.

३. तजेलदार त्वचा

दररोज खजुराचं सेवन केल्याने त्वचा तजेलदार होते.

४. केसांचा पोत सुधारण्यास मदत

खजुरामध्ये असणारे ब जीवनसत्व आणि लोह याचा केसांचा पोत सुधारण्यास मदत होते. खजुराचे तेल लावल्यास केस जाड आणि लांब होतात.

५. केस गळण्यावरील उत्तम उपाय

केस गळणे ही समस्या पूर्वी केवळ वयस्कर लोकांमध्येच दिसून येत होती. मात्र आता सर्वच वयोगटातील लोकांना ही समस्या जाणवते. खजुरामधील घटक ही समस्या दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. त्यामुळे दैनंदिन आहारात खजुराचा समावेश असावा.