benefits of eating soaked Anjeer in water: अंजीर हे अत्यंत फायदेशीर फळ असून सुपरफूड मानले जाते. आपल्या नियमित डाएटमध्ये अंजीरचा समावेश करून घेणे उत्तम ठरते. अंजीरचे सेवन बदाम अथवा मनुकाप्रमाणे केले जात नाही. तर केवळ १ वा २ अंजीर रात्री पाण्यात भिजत घालून त्याचे पाणी आणि फुगलेले अंजीर खाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्हालाही सतत अशक्तपणा येत असेल तर तुम्ही भिजवलेल्या अंजीराचा आहारात समावेश करु शकता. दररोज बदाम, अक्रोड आणि भिजवलेल्या काजूंसोबत अंजीर खायला विसरू नका. एक ग्लास पाण्यात दोन अंजीर खाऊन दिवसाची सुरुवात करा.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अंजीर पाणी पिणे महत्वाचे का आहे?

अंजीर पाणी आणि अंजीर खाल्ल्याने प्रजनन अवयव निरोगी राहतात. अंजीरमध्ये अनेक आवश्यक खनिजे असतात. जसे- झिंक, मॅंगनीज, मॅग्नेशियम आणि लोह. यामुळे तुमचे प्रजनन आरोग्य सुधारते. तसेच, त्यात उच्च अँटिऑक्सिडंट्स आणि फायबर असतात.

रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते

अंजीरमध्ये पोटॅशियम जास्त असते. तसेच, अंजीरमध्ये क्लोरोजेनिक ऍसिड असते जे रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास मदत करते. टाइप २ डायबिटीस असणाऱ्या व्यक्तींसाठी रोज भिजलेले अंजीर खाण्यामुळे ब्लड शुगरच्या पातळीत कमतरता येते आणि शुगर नियंत्रित होते.

बद्धकोष्ठतेमध्ये फायदेशीर

अंजीरमध्ये भरपूर फायबर असते ज्यामुळे बद्धकोष्ठता कमी होते. बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी अंजीर जरूर खावे. हे आहारासाठी चांगले आहे.

त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले

आपल्या डाएटमध्ये अंजीरच्या पाण्याचे समावेश केल्यामुळे शरीरातील अनावश्यक विषारी पदार्थ बाहेर काढून टाकण्यास मदत मिळते. यामुळे त्वचा हेल्दी राखण्यास फायदा होतो. त्वचेसंबंधित समस्यांसाठी हे एक सुपरफूड मानले जाते. यामुळे नियमित २ अंजीर रात्री भिजवा आणि सकाळी अंजीरचे पाणी पिऊन २ भिजवलेले अंजीर खा.

हेही वाचा – Fenugreek Benefits: मेथीचे पाणी प्यायल्याने शरीराला होतात ‘हे’ फायदे, जाणून घ्या

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

तुम्ही वजन कमी करण्यासाठी जर एखादे डाएट फॉलो करत असाल तर अंजीरचे सेवन करण्याचाही विचार करू शकता. वजन कमी करण्यासाठी शरीराला जास्त फायबर असणाऱ्या पदार्थांची आवश्यकता असते आणि अंजीरमधून ते अधिक प्रमाणात शरीराला मिळते. त्यामुळे वजन कमी करण्याकरिता सकाळी उपाशीपोटी अंजीराचे पाणी पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of eating soaked anjeer in water amazing health benefits of eating overnight soaked figs srk
Show comments