हल्ली सर्वांचीच जीवनशैली खूप धावपळीची आणि व्यस्त झालीय त्यामुळे वेळेवर जेवण, झोप आणि व्यायाम या गोष्टी सर्वांनाच करता येतात असे नाही. त्यांच्या अभावामुळे लोकांना अनेक आजारांचा सामना करावा. मात्र काही लोकांच्या आजारांचे मूळ कारण त्यांचे वाढलेले वजन असते. वाढलेले वजन माणसाला अनेक प्रकारे हानी पोहोचवते आणि एकदा वजन वाढू लागले की ते लवकर नियंत्रणात येत नाही. मग वजन कमी करण्यासाठी लोक अनेक मार्गांनी प्रयत्न करतात. तुम्हीही वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर, घरच्या घरी या पदार्थाचं सेवन नक्की करा. तुम्हाला जर वजन कमी करायचे असेल तर तुम्ही बडीशेपच्या पाण्याचे सेवन करू शकता.
बडीशेपचं पाणी लठ्ठपणा कमी करण्यावर रामबाण उपाय
बडीशेप प्रत्येकाच्या घरी असतेच. सहसा लोकांना जेवणानंतर बडीशेप खाण्याची सवय असते. बडीशेपचे खाण्याचे अनेक फायदे आहेत. सकाळी रिकाम्यापोटी बडीशेपचे पाणी पिल्यास वजन कमी होऊ शकते. रिकाम्या पोटी सेवन केल्यास डिटोक्स होण्यास मदत मिळते. याशिवाय यात फायबर भरपूर असल्याने पचन संस्था सुरळीत राहते.रिकाम्या पोटी एका बडीशेपच्या पाण्याचे सेवन केले तर ते वजन कमी करण्यास मदत करते, शिवाय यामुळे लठ्ठपणा देखील नियंत्रित ठेवता येऊ शकतो. त्यामुळे रिकाम्या पोटी बडीशेपच्या पाण्याचे सेवन करावे. जर तुम्हाला शरीर डिटॉक्स करायचे असेल तर एका बडीशेपचे पाणी रिकाम्या पोटी प्या. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांच्यासाठी बडीशेपचे पाणी खूप उपयुक्त आहे.
कसे बनवाल बडीशेपचे पाणी
बडीशेपचे पाणी बनवण्यासाठी १ टेबलस्पून बडीशेप २ लिटर पाण्यात रात्रभर भिजत ठेवा. आता सकाळी उकळून घ्या. नंतर गाळून कोमट प्या.
डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते
बडीशेपचे पाणी आपल्या डोळ्यांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. बडीशेपमध्ये व्हिटॅमिन ए आढळते ज्यामुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. तसेच डोळ्यांवरील सूज किंवा जळजळ कमी होते.
उच्च रक्तदाब
बडीशेपच्या पाण्यात पोटॅशियमचे प्रमाण अधिक असते. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहते. तसेच हृदयासंबंधित अनेक आजार दूर ठेवते.
हेही वाचा – अंड्यातील पिवळं बलक खाणं शरीरासाठी चांगलं की वाईट? खरंच वाढतो हृदयविकाराचा धोका? जाणून घ्या
कर्करोग
बडीशेपच्या पाण्यामध्ये अँटी ऑक्सिडेंट असतात. ज्यामुळे शरीराला कर्करोगासारख्या गंभीर आजारांविरुद्ध लढा देण्याची क्षमता मिळते. बडीशेपचे पाणी स्तनाचा कर्करोग, फुफ्फुसाचा कर्करोग किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या कर्करोगावर देखील फायदेशीर आहे, परंतु ते घेण्यापूर्वी डॉक्टर सल्ला घ्या.