Hair Care: केसांच्या समस्यांमुळे प्रत्येकजण त्रस्त आहे. केस गळणे आणि सतत पातळ होण्याच्या समस्येवर मात करण्यासाठी अनेक प्रकारच्या तेलांचा वापर केला जातो. पण, तुम्ही कधी डोक्याला तूप लावण्याचा प्रयत्न केला आहे का? खरं तर केसांना तूप लावणे हा एक आयुर्वेदिक उपाय आहे जो केसांची वाढ होण्यासाठी आणि दाट होण्यासाठी प्रभावी आहे. तूप हे अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडंट्सचाही चांगला स्रोत आहे ज्यामुळे केसांच्या अनेक समस्या दूर होतात. जाणून घ्या केसांना तूप कसे लावायचे आणि ते लावल्याने कोणते फायदे होतात.
केसांना तूप लावण्याचे फायदे | Benefits Of Applying Ghee On Hair
केस वाढतात
केसांना तूप लावल्याने टाळूतील रक्ताभिसरण वाढते, ज्यामुळे केस लांब, दाट आणि निरोगी होतात. हे केसांच्या वाढीस देखील मदत करते आणि केस गळतीची समस्या कमी करण्यासाठी देखील हा उपाय उपयुक्त आहे. केसांना तूप लावण्यासाठी ते कोमट करा आणि बोटांनी किंवा कापसाच्या मदतीने केसांच्या मुळापासून टोकापर्यंत तूप लावा. हे रात्रभर डोक्यावर ठेवता येते किंवा डोके धुण्याच्या एक तास आधी केसांना तूप लावू शकता.
हेही वाचा – तुमच्या या चुकीच्या सवयींमुळे तुम्ही पडू शकता नैराश्याला बळी, आजपासून बदला या वाईट सवयी
कोंडा होईल गायब
कोंडा घालवण्यासाठी तूप अत्यंत गुणकारी आहे. एका भांड्यात २ चमचे तूप, एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा बदाम तेल एकत्र करा. हे मिश्रण टाळूवर नीट लावा आणि तासाभरानंतर डोके धुवा. कोंडा दूर होईल.
हेही वाचा – झिंक थकवा दूर करण्यासाठी आणि उर्जा पातळी वाढवण्यास ठरू शकते का फायदेशीर? डॉक्टरांनी सांगितले कसे करावे सेवन?
केस मऊ होतील
जरी केसांना साधे तूप लावल्याने केस मऊ होतात, पण खोबरेल तेलात मिसळून लावल्याने केस अत्यंत मऊ होतात. एक चमचा खोबरेल तेलात समान प्रमाणात तूप मिसळा. डोक्याला लावा आणि एक ते दीड तासानंतर डोके शॅम्पूने रोजच्याप्रमाणे धुवा. जर तुम्ही हा उपाय आठवड्यातून एकदा वापरलात तर तुम्हाला तुमच्या केसांवर आश्चर्यकारक परिणाम झालेला दिसून येईल.
टाळूला ओलावा मिळतो
ज्यांचे केस जास्त कोरडे आहेत त्यांच्यासाठी तूप आश्चर्यकारक आहे. डोक्याला तुपाने मालीश केल्याने कोरड्या, खाज सुटलेल्या टाळूला ओलावा मिळतो. यामुळे केसांमधील कोरडेपणा दूर होतो आणि केस मऊ, रेशमी आणि चमकदार होतात.
(टीप – हा लेख प्राप्त माहातीवर आधारीत आहे. )