benefits of foot massage : सध्याच्या धावपळीच्या जगात शांत झोप घेण्यासाठी लोक विविध पद्धतींचा अवलंब करताना दिसतात. मात्र अनेक प्रयत्न करूनही शांत झोप येत नाही. अशाने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्या निर्माण होतात. झोपेअभावी लोक तणावाचे बळी ठरतात. तर, बहुतेकांना सकाळी झोपेतून उठल्यानंतर थकवा जाणवत राहतो. अशा वेळी काय करावे सुचत नाही. जर तुम्हीही झोपेच्या समस्येने त्रस्त असाल, तर आम्ही तुम्हाला काही उत्तम टिप्स सांगणार आहोत; ज्यांचा अवलंब करून तुम्ही रात्री शांत झोप घेऊ शकता.

झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना करा मालिश

तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी पायांच्या तळव्यांना मालिश करू शकता. तळव्नायां व्यवस्थित मालिश केल्याने पायांच्या नसांना आराम मिळतो आणि थकवाही दूर होतो. असे मालिश केल्यामुळे रक्त परिसंचरण सुरळीत होते. मालिशसाठी आधी हातात थोडे तेल घ्या आणि नंतर हलक्या हाताने मालिश करा. तुम्ही पाय आणि तळव्यांना मालिश करून आराम मिळवू शकता.

हेही वाचा – ९० मिनिटे काहीच न करता जिंका भरघोस बक्षीस! ‘या’ देशात सुरूय अनोखी स्पर्धा; VIDEO पाहून युजर्स शॉक

नैराश्यासारख्या गंभीर समस्यांपासून मिळेल आराम

आजकाल अनेक लोक तणावपूर्ण जीवन जगत आहेत. अशा लोकांनीदेखील त्यांच्या पायाच्या तळव्यांना मालिश करावे. तसे केल्यामुळे थकवा दूर होतोच; पण नैराश्यासारख्या गंभीर आजारांपासूनही आराम मिळतो. शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या आराम मिळविण्यासाठी तुम्ही दररोज रात्री झोपण्यापूर्वी किमान तीन ते चार मिनिटे पायांना मालिश करावे.