Meditation Benefits: रात्री झोपण्यापूर्वी केलेले २० मिनिटांचे ध्यान चार तासांच्या झोपेइतके असल्याचे म्हटले जाते. जेव्हा तुम्हाला अनेकदा रात्री तणावामुळे किंवा कोणत्याही कारणामुळे झोप येत नाही आणि तेव्हा तुम्ही झोपण्यापूर्वी ध्यान केल्यास त्याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. खरं तर झोपण्यापूर्वी ध्यान केल्याने तुमचे मन शांत होते आणि शरीरावरही त्याचा खोल परिणाम होतो. पण, झोपण्यापूर्वी ध्यान कसे करावे, त्याची पद्धत काय आहे आणि त्यानंतर सतत असे केल्याने तुम्हाला कोणते फायदे मिळू शकतात, हे आज आम्ही तुम्हाला सांगू.
झोपण्यापूर्वी २० मिनिटांचे ध्यान कसे करावे
रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही २० मिनिटे आरामात ध्यान करा. ध्यान केल्याने पटकन झोप लागायला मदत मिळते. खरं तर झोपेच्या कमतरतेवर मात करण्यासाठी हे उपयुक्त आहे आणि यामुळे मानसिक शांतीदेखील मिळते.
झोपण्यापूर्वी ध्यान कसे करावे
- झोपण्यापूर्वी २० मिनिटे ध्यान करण्यासाठी सर्वात आधी खोलीतील लाईट बंद करा आणि नंतर डोळे मिटून घ्या.
- त्यानंतर मांडी घालून आरामात बसा आणि नंतर हळूहळू दीर्घश्वास घ्या.
- तुम्हाला तुमचे डोळे बंद ठेवावे आणि फक्त १० मिनिटे श्वास आत घ्या आणि बाहेर सोडा.
- हे केल्यावर तुम्हाला शांतता जाणवेल आणि झोप येऊ लागेल.
हेही वाचा: कुकर आतून काळा पडलाय? ‘या’ तीन टिप्सच्या मदतीने एका मिनिटात कुकर करा चकाचक
झोपण्यापूर्वी ध्यान करण्याचे फायदे
झोपण्यापूर्वी २० मिनिटे ध्यान करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तो तुम्हाला शांत करतो. यामुळे मेंदूची विचार करण्याची गती कमी होते आणि त्यामुळे मानसिक शांती मिळते. याशिवाय फक्त २० मिनिटे ध्यान केल्याने तुमचा तणाव, चिंता कमी होऊ लागते.