सध्याची तरुणाई ही फिटनेस फ्रिक असल्याचं पाहायला मिळतं. त्यामुळे फिट राहण्यासाठी अनेक जण वर्कआऊट करण्यासोबतच डाएट करतात. हे डाएट करत असताना अनेक जणांना मधल्यावेळात भूक लागते. त्यामुळे या वेळात नेमकं काय खावं असा प्रश्न अनेकांना पडतो. यावेळी ओट्स हा सर्वोत्तम पर्याय आहे. ओट्स कोणत्याही वेळी खाता येऊ शकतात. अनेक जण सकाळी नाश्तामध्ये ओट्स खातात. विशेष म्हणजे ओट्स शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असून त्याचे काही शारीरिक फायदे आहेत ते जाणून घेऊयात.

१. पचनक्रिया सुधारते.

२. वजन नियंत्रणात येते.

३. ब्लड कोलेस्ट्रॉलचा स्तर कमी होतो.

४. पोट पटकन भरतं.

५. दम्याचा धोका कमी होतो

६. . रक्तदाब नियंत्रणात राहतो.

७. आरोग्यासाठी पौष्टीक

८. हृदयाशी निगडीत आजार होण्याची शक्यता कमी असते.

९. ओट्स अॅंटीऑक्सिडंटसचे काम करतात.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)