Benefits Of Orange Juice : संत्र्याचा रस पिणे जेवढे चवदार तेवढेच ते आरोग्यदायीही आहे. संत्र्याच्या रसामध्ये अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात. त्यामध्ये व्हिटॅमिन-ए, व्हिटॅमिन-बी, व्हिटॅमिन-सी, फायबर, कॅल्शियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. सुटीच्या दिवसांत तुम्ही मस्त नाश्ता करीत असाल किंवा व्यायामानंतर काहीतरी प्यायचे असेल, तर अशा सर्वांसाठी संत्र्याचा रस हा एक चांगला पर्याय आहे. संत्र्याचा रस पोषक घटकांनी भरलेला आहे आणि या रसाची चव कडवट नसल्यामुळे आवळा किंवा कारल्याच्या रसापेक्षा एक ग्लास ताज्या संत्र्याचा रस जास्त प्रमाणात घेतला जाऊ शकतो. परंतु, जेव्हा हा रस दररोज पिण्याची वेळ येते तेव्हा ते थोडे अवघड होऊ शकते. नक्कीच, त्याचे स्वतःचे फायदे आहेत; परंतु आपण दररोज ते सेवन करणे खरोखरच आरोग्यदायी आहे का? चला तर मग जाणून घेऊ संत्र्याचा रस रोज पिणे आरोग्यासाठी चांगले की वाईट?
संत्र्याच्या रसाचे आरोग्यदायी फायदे
रोगप्रतिकार शक्ती वाढवते
संत्र्याचा रस व्हिटॅमिन सीने भरलेला असतो, जो तुमची प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतो. हा रस तुम्हाला सर्दी, फ्लू आणि इतर दाहक रोगांपासून सुरक्षित ठेवू शकतो.
त्वचा निरोगी ठेवतो
संत्र्याचा रस तुमच्यासाठी चमत्कार करू शकतो. त्यात केवळ व्हिटॅमिन सीच नाही, तर अँटिऑक्सिडंट्सदेखील आहेत; जे फ्री रॅडिकल क्रियाकलापांशी लढण्यात मोठी भूमिका बजावतात. फ्री रॅडिकल्समुळे तुमची त्वचा निस्तेज दिसू शकते आणि सुरकुत्या व वृद्धत्व वाढवते. संत्र्याच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात असलेले व्हिटॅमिन सी तुम्हाला तरुण आणि तेजस्वी त्वचा प्राप्त करण्यास मदत करू शकते.
मजबूत हाडे
संत्र्यामध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे आपल्या हाडांच्या आरोग्यासाठी मदत करू शकते आणि त्यांना मजबूत ठेवू शकते.
किडनी स्टोन्स
संत्र्यामध्ये सायट्रेटचे प्रमाण जास्त असते. याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही संत्र्याचा रस पिता तेव्हा ते कॅल्शियम ऑक्झलेट स्टोन तयार होण्यास मदत करते आणि किडनी स्टोनपासून आराम देते. तसेच उच्च रक्तदाबाची लक्षणे कमी करण्यास मदत करू शकते. संत्र्यामध्ये आढळणारी पेक्टिन आणि लिमिनोइड ही संयुगे रक्तवाहिन्यांचे कडक होणे कमी करण्यास आणि रक्तातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यास मदत करतात.
हेही वाचा >> Navratri 2024: नवरात्रीत ९ दिवस उपवास करताय? खा हे पदार्थ, दिवसभर राहाल एनर्जेटिक
दररोज संत्र्याचा रस पिणे योग्य आहे का?
दररोज संत्र्याचा रस पिणे योग्य आहे का? तर नाही. संत्र्याचा रस दररोज पिणे योग्य नाही; पण हा रस तुम्ही अधूनमधून पिऊ शकता. संत्र्याचा रस जास्त प्रमाणात घेतल्यास डंपिंग सिंड्रोम होऊ शकतो. डंपिंग सिंड्रोम म्हणजे तुम्ही खाल्ल्यानंतर जास्त साखर असलेले पदार्थ तुमच्या पोटातून तुमच्या लहान आतड्यात जातात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात न पचलेले अन्न तुमच्या लहान आतड्यात जाते. तुम्हाला ओटीपोटात चमक, मळमळ किंवा रक्तातील साखरेचा चढ-उतार जाणवू शकते. संत्र्याच्या रसामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असल्याने, तुम्ही त्याचे नियमित सेवन केल्यास तुम्हाला डंपिंग सिंड्रोम होऊ शकतो.
संत्र्यामध्ये फायबर भरलेले असते; ज्यामुळे पचन व्यवस्थित होते. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेव्हा तुम्ही संत्र्याचा रस काढता, तेव्हा त्यातील फायबर बहुतेक काढून टाकले जाते आणि तुमच्याकडे पोषक घटकांसह फक्त एक ग्लास गोड पाणी उरते. फायबर साखरेचे शोषण कमी करण्यास आणि आपल्या पाचन तंत्रातील विषारी पदार्थ व कचरा काढून टाकण्यास मदत करते.
हेही वाचा >> Health Tips: शिजवलेल्या भाज्या की कच्च्या भाज्या? कोणत्या भाज्या खाणं जास्त फायदेशीर; वाचा संपूर्ण माहिती
बरेच लोक संत्र्याचा रस घेण्यापेक्षा पॅकेज केलेला रस खरेदी करणे पसंत करतात. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, बाजारातून विकत घेतलेला संत्र्याचा रस बहुतांशी वेळा
साखरेने भरलेला असतो आणि तो चवदार बनवण्यासाठी त्यात रंग टाकलेला असतो. त्यामुळे घरीच बनविलेला संत्र्याचा रस प्या.