Benefits Of Putting Ghee In Belly Naval: आजवर आपण तुपाचे अनेक आश्चर्यकारक फायदे ऐकले पाहिले असतील. नितळ कचेसारखी त्वचा हवी असेल किंवा दाट मुलायम केस हवे असतील तर आहारात तुपाचा वापर करण्यास सांगितले जाते. शिवाय चेहरा व केसांना सुद्धा तूपाचा मास्क लावण्याचा सल्ला काहीजण देतात. पण तुम्हाला माहित आहे का रात्री झोपताना तुम्ही बेंबी म्हणजेच पोटाच्या नाभीमध्ये काही थेंब तूप घातल्यास सुद्धा तुम्हाला अगदी चमत्कारिक लाभ मिळू शकतो. काय आहेत हे फायदे चला पाहूया…
१) वर म्हटल्याप्रमाणे नितळ त्वचेसाठी तुपाचे योगदान मोठे आहे. त्यामुळे बेंबीमध्ये तूप घातल्याने शरीरातील अतिरिक्त उष्णता बाहेर पडण्यास मदत होते व परिणामी चेहऱ्यावर दिसणारे फोड, पिंपल हे सुद्धा दूर होतात. अनेकदा खाण्यात काही आंबट पदार्थ आल्याने सुद्धा हा त्रास जाणवतो, अशावेळी तुपाने शरीरातील टाकाऊ पदार्थ बाहेर फेकण्यास मदत होते आणि त्याचा एकूणच परिणाम आरोग्यासह त्वचेवर सुद्धा दिसून येऊ शकतो.
२) बेंबी हा शरीराचा केंद्रबिंदू असल्याने इथे अन्य अवयवांना जोडून ठेवणारे अनेक ऍक्युप्रेशर पॉईंट असतात. त्यामुळे बेंबीमध्ये काही थेंब तूप टाकून मसाज केल्यास सांधेदुखीचा त्रास सुद्धा दूर होऊ शकतो.
३) त्वचेप्रमाणेच केसाला सुद्धा या तुपाचे फायदे मिळाल्याने अकाली केस पांढरे होणे किंवा अत्यंत रुक्ष होणे यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते.
४) बेंबीमध्ये तूप घातल्याने पोटदुखी व ओटीपोटात होणाऱ्या वेदना दूर होण्यास मदत होते. किंचित ओवा पावडर किंवा बारीक ओव्याचे दाणे सुद्धा तुपात मिसळून वापरू शकता याने पटकन आराम मिळतो. तसेच तुम्हाला पोट साफ न होण्याचा त्रास असले तर यावरही हा उपाय काम करू शकतो.
५) महिलांना मासिक पाळीत होणाऱ्या वेदना दूर करण्यासाठी हा तुपाचा उपाय रामबाण सिद्ध होऊ शकतो. यासाठी काही थेंब तूप बेंबीसह आपल्या ओटीपोटाच्या भागात सुद्धा लावून मसाज करू शकता.
हे ही वाचा<< उंची वाढवण्यासाठी ‘या’ १० पदार्थांची होईल मदत; कसे करावे सेवन, पाहा
६) वरील माहितीशिवाय एक बोनस फायदा म्हणजे अनेकदा आंघोळ करताना किंवा एकूणच शरीर स्वच्छ करताना बेंबीकडे आपले दुर्लक्ष होते अशावेळी तुपाने मसाज केल्यास त्यातील चिकट घाण व मला दूर होण्यास मदत होते.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे यास वैद्यकीय सल्ला समजू नये.)