Benefits of Rubbing Banana Peels on Face: केळी आपल्या शरीरातील पाण्याची कमतरता पूर्ण करतात आणि शरीराला हायड्रेटेड ठेवण्यास मदत करते.मात्र, तुम्हाला हे माहिती आहे का? की, केळीची साल सुद्धा आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असते. केळीच्या सालीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. केळीच्या सालीचा फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. केळी त्वचेसोबतच आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानली जाते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

केळीच्या सालीमध्ये कॅल्शियम, जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, फायबर असे अनेक घटक असतात. जे त्वचेतील घाण काढून टाकते. केळीच्या सालीचा आतील भाग चेहरा आणि मानेवर चोळा, यामुळे त्वचा हायड्रेट राहते आणि काळपटपणा दूर होतो.

केळीच्या सालीचा आतील भाग तुम्ही चेहऱ्यावरील पिंपल्सवर लावल्याने पिंपल्सची समस्या दूर होते. १० मिनिटांनी थंड पाण्याने धुवा. असे केल्याने पिंपल्स कमी होतात. जर तुम्ही डार्क सर्लकलने त्रस्त असाल तर केळीच्या सालीचा आतील भाग डोळ्यांखाली चोळा. केळीची साल वापरण्यापूर्वी चेहरा नीट धुवा.

हेही वाचा >> Poppy Seeds: उन्हाळ्यात दुधात चिमुटभर खसखस टाकून नक्की प्या; होतील ‘हे’ आरोग्यदायी फायदे

केळीच्या सालीचा फेसपॅक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो. केळीच्या सालीचा फेसपॅकमुळे आपल्या चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते. यासाठी आपल्याला केळीची साल, दही, कोरफड, गुलाब पाणी आणि हळद लागणार आहे. हे सर्व साहित्य बारीक करून घ्या आणि त्याची चांगली पेस्ट तयार करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारण वीस मिनिटे ही पेस्ट आपल्या चेहऱ्यावर राहूद्या आणि नंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवा. हा फेसपॅक आपण आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजेत.

वापरासाठी केळ्याची साल नेहमी ताजी असावी. केळीची साल साठवून ठेवू नका.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Benefits of rubbing banana peels on face beauty banana peels benefits for skin use like this for glowing face srk