Benefits of walking : दररोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आपण आरोग्याकडे नेहमी दुर्लक्ष करतो. अनेकांना एका ठिकाणी तासन्-तास बसून काम करण्याची सवय आहे.त्यामुळे शरीराची हालचाल खूप कमी होते ज्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. चांगल्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम करणे, धावणे, चालणे तितकेच गरजेचे आहे.
अनेकदा डॉक्टर आपल्याला चालण्याचा सल्ला देतात पण खरंच चालण्यामुळे आपल्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो का? आज आपण चालण्याचे फायदे जाणून घेऊ या.
न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी चालण्याचे फायदे सांगितले आहे.
अंजली मुखर्जी यांनी सांगितल्याप्रमाणे चालण्यामुळे कोणते फायदे होतात, जाणून घेऊ या.
१. चालण्यामुळे वजन कमी होते.
२. शरीराला आकार देण्यास मदत होते.
३.ह्रदय निरोगी ठेवण्यास मदत होते.
४. मधुमेहाचा धोका कमी करण्यास मदत होते.
५. कॅन्सरचा धोका कमी होतो.
६. स्मरणशक्ती वाढवण्यास मदत होते.
७. सांधेदुखीचा त्रास कमी होतो.
८. रोगप्रतिकारशक्ती वाढते
९. ऊर्जा वाढते आणि तुम्हाला प्रसन्न वाटतं.
anjalimukerjee या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान माहिती दिली.” तर काही युजर्सनी प्रश्न सुद्धा विचारले आहेत.