ओवा हा प्रत्येक घरात असतोच. ओव्याची चव थोडी वेगळी असली तरी किंचितश्या ओव्याच्या वापराने जेवणाची चव वाढते. मग ती भजी किंवा चकली असो किंवा पुऱ्या, पराठा, खाकरा असो. त्यामुळे गृहिणींच्या स्वयंपाक घरात ओवा असतोच. पूर्वी स्वयंपाक घरातच नाही तर आजीबाईच्या बटव्यात देखील ओव्याला विशेष स्थान होतं, पोट दुखलं की आजी ओवा द्यायची पण नंतर अनेक औषधं आली आणि ओव्याचा विसर पडला, पण ओवा हा पचनाच्या सर्व तक्रारींवर गुणकारी आहे.
– पोट दुखणे किंवा फुगणे : जर सतत पोट दुखणे किंवा पोट फुगण्याचा त्रास होत असेल तर अर्धा चमचा ओवा + चिमुटभर सैंधव रात्री झोपताना कोमट पाण्याबरोबर घ्येतल्यास अपचन, शौचास साफ न होणे, पोटदुखी अशा अनेक तक्रारी दूर होतात.
– लहान मुलांच्या पोटदुखीवर फायदेशी : लहान मुलांना सतत पोटदुखीचा त्रास जाणवतो. त्यामुळे त्यांना कोमट पाण्याबरोबर ‘ओवा अर्क’ द्यावा. तसेच बेंबीभोवती गोलाकार चोळून पोट शेकल्यास लगेच पोटदुखी थांबते. तसेच जंताचा त्रासही कमी होतो.
वाचा : सफरचंद सालांसकट खाण्याचे ‘हे’ आहेत फायदे…
– ज्या लहान मुलांना रात्री अंथरूणात लघवी करणाऱ्यी सवय आहे त्यांना ओवा गुळाची गोळी रात्री झोपताना खायला द्यावी. ही गोळी काळ्या वाटाण्याच्या आकाराएवढी असावी.
– ज्यांना लघवीला फार वेळा होते त्यांनी गूळ व ओवाचूर्णाच्या समप्रमाणात गोळ्या करून दिवसातून चार-चार तासांनी घेतल्यास लगेच फरक पडतो.
– निद्रानाश झाल्यास झोपण्याआधी एक कप ओव्याचे पाणी पिऊन झोपा. यामुळे झोप चांगली येते.
पण हे उपाय करताना एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवावी ती म्हणजे ओवा नेहमी थोडासाच चावून पाण्याबरोबर गिळावा, अन्यथा तोंड येते.
सौंदर्य खुलवण्यापासून ते चिवट डाग घालवण्यापर्यंत, लिंबाच्या सालीचे सात फायदे