सध्याचे जीवन हे खूप धावपळीचे बनले आहे. प्रत्येकाला सध्या आपापल्या कामाचा ताण जाणवत असतो. तसेच कामाच्या ताणामुळे अनेकदा आपल्या जेवणाच्या वेळा देखील सारख्या नसतात. या सर्व गोष्टींचा परिणाम आपल्या चेहऱ्यावर होत असतो. चेहरा सुंदर ठेवण्यासाठी अनेक घरगुती उपाय तसेच बाहेर अनेक प्रॉडक्ट्स उपलब्ध आहेत. घरगुती उपाय म्हणाल तर बेसन पिठाचा उपयोग अनेकदा त्वचा चांगली राहावी म्हणून केला जातो. बेसन पीठ हे चेहरा स्वच्छ करणे, डाग काढणे, तसेच त्वचा उजळ करणे त्यासाठी गुणकारी आहे.
बेसनपासून वेगवेगळे फेस पॅक तयार करून चेहऱ्यावर लावले जाऊ शकतात. ज्यामुळे चेहऱ्यावर चांगला परिणाम दिसून येतो. बेसनाच्या त्वचेवर होणाऱ्या परिणामाबद्दल सांगायचे तर ते चेहऱ्यावरील तेलकटपणा काढून टाकण्यास मदत करते. चिकटपणा निघून जातो. बेसन चेहऱ्यावरील असलेली घाण काढून टाकण्यास मदत करते.
हेही वाचा : पालकांनो, मुलं अभ्यास करत नाहीत? अभ्यासाची गोडी लावण्यासाठी वापरा ‘या’ टिप्स
बेसन आणि दूध
एक चमचा बेसन घेऊन त्यात दुध एकत्रित करून त्याची पेस्ट तयार करा. या मिश्रणामध्ये चिमूटभर हळद मिसळू शकतो. या फेस पॅक १० ते १५ मिनिटे चेहऱ्याला लावल्यानंतर चेहरा धुवावा. हा फेस पॅक चेहऱ्यावरील पिंपल्स कमी करण्यासाठी मदत करतो.
बेसन आणि मुलतानी माती
जर का तुमची त्वचा जास्त तेलकट किंवा चिकट असेल तर तुम्ही बेसन आणि मुलतानी मातीचा फेस पॅकचा वापर करू शकता. २ चमचे बेसन आणि २ चमचे मुलतानी माती मिक्स करावी. गुलाबपाणी किंवा सध्या पाण्याने ही पेस्ट तयार करावी. हा फेस पॅक १५ मिनिटे चेहऱ्याला लावून ठेवावा. चेहरा धुतल्यानंतर मॉइश्चरायझर लावायला विसरू नका.
बेसन आणि टोमॅटो
२ चमचे बेसन पीठ घेऊन त्यात टोमॅटोचे मिश्रण मिक्स करावे. पंच्या मदतीने ही पेस्ट तयार करू शकता. हा फेस पॅक १० मिनिटे चेहऱ्यावर ठेवावा. यामुळे चेहऱ्यावरील काळे डाग आणि टॅन दूर होण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा : वर्कआऊट करण्याआधी व नंतर ‘हा’ नियम नेटाने पाळा, शरीराला मिळतील ६ मोठे फायदे
बेसन आणि दही
दोन चमचे बेसनमध्ये अर्ध्या लिंबाचा रस मिक्स करावा. त्यात आवश्यकतेनुसार दही मिक्स करून फेस पॅक तयार करावा. चेहरा तजेल होण्यासाठी हा फेस पॅक फायदेशीर ठरतो. यामुळे चेहऱ्यावरील मृत त्वचेच्या पेशी निघून जातात.
बेसन आणि पपई
बेसन आणि पपई मिक्स करून बेसनाचा आणखी एक एक्सफोलिएटिंग फेस तयार करता येतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी बेसन आणि पपईचा प्लस सामान प्रमाणात मिक्स करून त्यात गुलाबपाणी मिक्स करून फेस पॅक तयार करावा. १० मिनिटे हा फेस लावल्यानंतर चेहरा धुवावा.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)