मोबाईल कंपन्यांमध्ये सध्या कमी किंमतीत जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देणारा फोन लाँच करण्याची स्पर्धाच लागली आहे. यामध्ये कोणतीच कंपनी मागे नाही. सर्वच कंपन्या बाजारात आपले स्थान बळकट करण्यासाठी स्वस्तात मस्त स्मार्टफोन लाँच करतात. कॅमेरा, दमदार बॅटरी आणि वेगवाग प्रोसेसरसोबत स्वस्तात मस्त स्मार्टफोन बाजारात उपलब्ध आहेत. १० हजार रूपयांपेक्षा कमी किमतीच्या स्मार्टफोनबद्दल आज आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहे.

Realme 3: किंमत ८,९९९ रूपये
Realme 3 या फोनची प्राथमिक किंमत फक्त ८९९९ रूपये आहे. या फोनचा डिस्प्ले HD+ असून 6.2 इंचाचा आहे. हा फोन MediaTek Helio P70 प्रोसेसरचा आहे. याची बॅटरी ४२३० mAhची आहे. याचा ड्युअल रिअर कॅमेरा आहे. ड्युअल सिमची सुविधाही आहे. सेल्फी आणि बॅक कॅमेरा १३ मेगापिक्सलचा आहे.

Samsung Galaxy A10: किंमत ८४९० कीमत- 8,490 रुपये
सॅमसंग गॅलेक्सी A10चा डिस्प्ले 6.2 इंचाचा आहे. या फोनचा डिस्प्ले InFinity-V आहे. फोनची रॅम 2GB आणि 32GBचे स्टोरेज देण्यात आले आहे. या फोनचा स्टोरेज तुम्ही तब्बल 512GB पर्यंत वाढवू शकतात. बॅटरी 3,400 mAh ची देण्यात आली आहे. फ्रंट कॅमेरा ५ मेगापिक्सल आणि बॅक कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे.

Redmi Note 7: प्राथमिक किंमत ८९९९ रुपये
Redmi Note 7 या स्मार्टफोनची प्राथमिक किंमत ८९९९ रूपये आहे. या फोनचा डिस्प्ले ६.३ इंचाचा HD+ आहे. फोनला गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शन देण्यात आले आहे. हा फोन क्वॉलकॉम 660 प्रोसेसरमध्ये चालतो. या फोनमध्ये 3GB/4GB रॅममध्ये उपलब्ध आहे. तर स्टोरेज 32GB/64GB आहे. बॅटरी 4,000 mAh देण्यात आली आहे. बॅक आणि सेल्फी कॅमेरा १३ मेगापिक्सल आहे.

Samsung Galaxy M10: किंमत ७९९९ रुपये
सॅमसंग Galaxy M10 चा डिस्प्ले 6.2 इंचाचा फूल HD+ इंफीनिटी-V असा आहे. फोनमध्ये Exynos 7870 प्रोसेसर आहे. या स्मार्टफोनची रॅम 2GB/3GB आहे तर स्टोरेज 16GB/32GB आहे.

Story img Loader