Yoga For Men & Women : दररोजच्या धावपळीच्या आयुष्यात आपण अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. पण आरोग्याची काळजी घेणे, खूप गरजेचे आहे. चांगला आहार आणि नियमित व्यायाम किंवा योगा करणे शरीरासाठी उत्तम असते. तुम्हाला माहिती आहे का काही योगा पुरुष आणि स्त्रियांनी नियमित करायला पाहिजे. आज आपण त्या विषयीच सविस्तर जाणून घेणार आहोत.
योग अभ्यासक मृणालिनी यांनी इन्स्टाग्रामवर या संदर्भात एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांनी प्रत्येक स्त्री व पुरुषाने नियमित करावीत अशी पाच योगासने सांगितली आहेत. विशेष म्हणजे त्यांनी ही योगासने व्हिडीओमध्ये करुन दाखवली आहेत. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ नीट पाहावा लागेल.
या व्हिडीओत सांगितल्याप्रमाणे-
१. उत्कटकोनासन
पेल्विक स्नायूंना बळकट करण्यास मदत होते. मांड्या व पाय मजबूत बनवतात
२. मलासन
बद्धकोष्ठता आणि अपचनाच्या समस्या कमी होतात. पाय, घोटे आणि मांड्या लवचिक होतात.
३. बद्धकोनासन
किडनी, प्रोस्टेट ग्लँड किंवा ब्लॅडर सक्रिय होतात आणि सायटिकाच्या दुखण्यावर आराम मिळतो.
४. अर्धहलासन
ओटीपोटाचे आरोग्य सुधारते आणि व्हेरिकोज व्हेन्ससाठी हा योगा उपयुक्त ठरतो.
५. वक्रासन
शरीर डिटॉक्सिफाय होते आणि पचनशक्ती सुधारते.
व्हिडीओत तुम्हाला वरील सर्व योगासने करुन दाखवली आहेत. याबरोबरच या योगासनाचे फायदे सु्द्धा सांगितले आहेत.
हेही वाचा : दुधाच्या रिकाम्या पिशव्या चुकूनही फेकू नका; फक्त हे करा…परिणाम पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
yogamarathi_ या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन योग अभ्यासक मृणालिनी यांनी हा व्हिडीओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “योगाची सुरुवात सूक्ष्म व्यायाम व वॉर्मअपने करुन त्यानंतर व्हिडीओमध्ये दाखवलेली योगासने नियमितपणे केल्यास त्याचे शारीरिक आणि मानसिक स्तरावर नक्कीच फायदे मिळतील
प्रत्येक योगासन ३० ते ६० सेकंद होल्ड करावे. योगासने करताना योगा मॅट किंवा सतरंजी वापरा.”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “खूप छान” तर एका युजरने लिहिलेय, “योग उच्यते.” आणखी एका युजरने कुतूहलाने विचारलेय, “हा व्हिडीओ हम्पी येथे बनवला आहे का?”