Best Food Combinations For Health : ‘यू आर व्हॉट यू इट’ अशी इंग्रजीत एक म्हण आहे. या म्हणीचा अर्थ आपण जे खातो त्याचा आपल्या शरीरावर, त्वचेवर परिणाम होतो. आपण जे आणि जसं खातो तशी आपली त्वचा होते आणि आपला चेहेरा दिसतो, त्यामुळे तुम्ही पौष्टिक अन्न खाणे, निरोगी जीवनशैलीचे पालन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी विविध प्रकारचे अन्नसुद्धा उपलब्ध आहेत; जेव्हा तुम्ही निरोगी पदार्थांचे सेवन करणे निवडता तेव्हा ते तुमचे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
वैयक्तिक अन्नाबरोबरच काही अन्न संयोजने अशी आहेत, जी तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असतात. हे अन्न संयोजन तुमचे आरोग्य सुधारून तुमच्या शरीराला महत्त्वाचे पोषक तत्वे प्रदान करतात.
पुढे काही अन्न संयोजने अशी आहेत, जी तुम्ही तुमच्या आहारात समाविष्ट करायला हवीत…
सफरचंदावर दालचिनी पावडर टाकणे (Cinnamon Powder on Apple)
सफरचंदामध्ये फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. विशेषतः सफरचंदामध्ये क्वेरसेटिन असते, जे हृदय आणि फुफ्फुसांच्या आरोग्यास मदत करते. सफरचंदाच्या कापांवर दालचिनी घातल्यानंतर ते दाहकविरोधी आणि रक्तातील साखर नियंत्रित करणारे फायदे शरीराला देते. दालचिनी रक्तातील ग्लुकोजच्या वाढीस कमी करण्यास मदत करते, त्यामुळे हे मिश्रण हलक्या आणि मधुमेही असलेल्या व्यक्तींसाठी चांगला नाश्ता ठरू शकतो.
संत्र्यासह बदाम खाणे (Almonds with Orange)
संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करतात. बदाम हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन ई आणि प्रथिने प्रदान करतात. एकत्रितपणे हे संयोजन त्वचेला फायदेशीर ठरतात आणि रोगप्रतिकारक शक्ती सुधारून ऊर्जा प्रदान करतात.
पालक आणि लिंबाचा रस (Spinach with Lemon Juice)
पालकामध्ये नॉन-हीम (वनस्पती-आधारित) लोहाचे प्रमाण जास्त असते, जे शरीराला शोषण्यास कठीण असते. व्हिटॅमिन सी समृद्ध असलेल्या लिंबाचा रस मिसळल्याने लोहाचे शोषण जलद होते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढते, ज्यामुळे थकवा कमी करण्यासाठी आणि लाल रक्तपेशींचे उत्पादन वाढवण्यासाठी पालक आणि लिंबाचा रस योग्य ठरतो.
बेरी आणि ग्रीक दही (Greek Yoghurt with Berries)
ग्रीक दही तुम्हाला प्रोबायोटिक्स आणि प्रथिने देते, ज्यामुळे आतड्यांचे आरोग्य सुधारते आणि स्नायूंच्या दुरुस्तीस मदत होते. बेरी हे फळ तुम्हाला फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स देतात, विशेषतः अँथोसायनिन्स जे पोटातील जळजळ कमी करण्यास मदत करतात. हे संयोजन पचन, रोगप्रतिकारक शक्ती आणि हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
हळद आणि काळी मिरी (Turmeric with Black Pepper)
हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे एक शक्तिशाली दाहकविरोधी संयुग आहे. काळी मिरी कर्क्यूमिनचे शोषण २०००% पर्यंत वाढवते. हे मिश्रण सांधेदुखी कमी करण्यासाठी, मेंदूचे आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे.