हृदयविकाराचा झटका हा एक अतिशय गंभीर आजार आहे ज्यातून बरे झाल्यानंतर आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक आहे. चांगला आहार घेतल्याने हृदयावरील दबाव आणि रक्ताभिसरण कमी होते. हृदयविकाराचा झटका आल्यानंतर, हृदयविकाराचा झटका येण्यापूर्वी तुम्ही खात असलेल्या पदार्थांपासून दूर राहणे महत्त्वाचे आहे. हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे आवश्यक आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
श्वेता महाडिक, क्लिनिकल आहारतज्ञ, फोर्टिस हॉस्पिटल, कल्याण सांगतात की, दीर्घायुष्य जगण्यासाठी आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी आहाराची काळजी घेणे आवश्यक आहे. हृदयविकार आणि उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आहार खूप प्रभावी ठरतो, म्हणून सर्वप्रथम जाणून घ्या की कोणते पदार्थ हृदय निरोगी ठेवतात. हृदयविकाराच्या झटक्यातून बरे झाल्यानंतर कोणता आहार प्रभावी ठरतो हे जाणून घेऊया.
( हे ही वाचा: हाताच्या त्वचेची सालं निघण्यामागे असू शकतात ‘ही’ गंभीर कारणे; जाणून घ्या त्यावर योग्य उपचार)
- आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करा. फळे आणि भाज्यांमध्ये भरपूर फायबर असते जे चयापचय सुधारते. गडद रंगाच्या भाज्यांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भाज्या आणि फळांचे अधिक सेवन केल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते आणि हृदय निरोगी राहते.
- आहारात संपूर्ण धान्याचा समावेश करा. संपूर्ण धान्यांमध्ये भरपूर फायबर असते. उच्च फायबरयुक्त पदार्थांमध्ये तुम्ही फळे, भाज्या आणि शेंगा (बीन्स) समाविष्ट करू शकता.
- आहारात प्रथिनांचा वापर करा. स्किम्ड दूध आणि त्यापासून उत्पादने, शेंगा, कडधान्ये, संपूर्ण धान्य, अंड्याचा पांढरा भाग, कोंबडी आणि मासे यांचे सेवन करा.
- आहारात ओमेगा ३ फॅटी अॅसिड असलेले पदार्थ खा. खराब कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी तुम्ही तेलकट मासे जसे की सार्डिन, मॅकरेल, ट्यूना, सॅल्मन, हेरिंग, ट्राउट, बदाम, अक्रोड आणि फ्लेक्ससीड्स खाऊ शकता. ओमेगा-३ फॅटी अॅसिडने समृद्ध असलेले हे पदार्थ हृदयाला निरोगी ठेवतात.
( हे ही वाचा: पहाटेच्या वेळीच हृदयविकाराचा झटका जास्त करून का येतो? ‘या’ लोकांना वेळीच व्हावे लागेल सावध)
- सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट पदार्थ जसे की बेकरी उत्पादने, पॅकेज केलेले पदार्थ, लाल मांस, तूप, लोणी, डालडा आणि मार्जरीन टाळा. लोणी, मलई आणि चरबी या प्राण्यांच्या उत्पादनांमध्ये आढळणारी संतृप्त चरबी टाळली पाहिजे.
- स्वयंपाक करण्याची पद्धत बदला. अन्न तळण्याऐवजी उकळून, ग्रील करून भाजून खावे. जेवणात मिठाचे प्रमाण कमी करा. मीठ बीपी वाढवू शकते. जेवणात लोणचे, पापड, डबाबंद पदार्थ, सुकी मासे, नमकीन, तयार चटणी, टोमॅटो केचप टाळा.
- कार्बोनेटेड पेये आणि जास्त साखर असलेले पदार्थ खाऊ नका जे हृदयासाठी धोकादायक आहे. दारूपासून दूर राहा.
- आठवड्यातून किमान पाच दिवस ३० ते ४० मिनिटे व्यायाम करा. यामध्ये योग, वेगवान चालणे, एरोबिक्स, पोहणे आणि सायकलिंग यांचा समावेश असू शकतो.