हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
फॅशनच्या दुनियेत कोणत्या स्टाइलला कधी सुगीचे दिवस येतील काहीच सांगता येत नाही. त्यात एखाद्या गोष्टीचं इंग्रजीत बारस झालं, की ती चच्रेत येणार हे नक्की. अगदी कालपरवापर्यंत केवळ लांबसडक केस नीट बांधता यावेत यासाठी बांधली जाणारी केसांची वेणी आता ‘ब्रेडिंग’ या गोंडस नावासह थेट रॅम्पवरून रेड काप्रेटवर अवतरली आहे. शाळेत लांबसडक, दाट केस मिरविणाऱ्या बऱ्याच मुली असतात. दोन वेण्या आणि त्यांना छानशी रिबीन बांधून मत्रिणींसमोर मिरवलं जायचं. पण कॉलेजपर्यंत येतायेता कधी ट्रेंड म्हणून तर कधी सांभाळायचा कंटाळा म्हणून या केसांना कात्री लागते. लांब केस असले, तरी ते सुटे ठेवले जातात किंवा पोनीटेल बांधला जातो. दाट केस नसतील तर वेणी बारीक दिसते, केसांना कर्ल्स येतात, डोकं मोठं दिसतं, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे वेणी बांधणेंमागे पडतें. सध्या हेच वेणी बांधणं ‘कुल’ ठरू लागलं आहे आणि केवळ कॉलेजत रुणींमध्येच नाही तर बॉलीवूड, हॉलीवूड सेलेब्रिटीजमध्येही या वेणीचे चाहते आहेत.
मध्यंतरी शाहीद कपूर-आलिया भट यांचा ‘शानदार’ सिनेमा आला होता. चित्रपट फारसा चालला नाही. पण चित्रपटामध्ये आणि प्रमोशनच्या काळात आलियाने वेणीच्या केलेल्या वेगवेगळ्या हेअरस्टाइल्स मात्र बऱ्याच गाजल्या. त्यानंतर दीपिका पदुकोन, सोनम कपूर, करिना कपूर, बिपाशा बासू अशा कित्येक बॉलीवूड सेलेब्रिटीजनी वेण्या मिरवायला सुरुवात केली. सध्याचा अंगाची लाही करणारा उन्हाळा, त्यात घाम या सगळ्यात केस मोकळे सोडणे हा पर्याय हद्दपार होतो. त्यानंतर येणाऱ्या पावसाळ्यात छत्री, बॅगेसोबत केस सांभाळताना नाकीनऊ येतात. मग अशा खास ठेवणीतल्या हेअरस्टाइल्सची आठवण होते. मागच्या वर्षी या काळात आंबाडे बांधण्याचा ट्रेंड आला होता. त्यातही प्रत्येकीची स्टाइल वेगळी, तिला जमेल आणि केस ‘बो’मध्ये व्यवस्थित बांधले जातील अशी. यंदाच्या वेणीच्या ट्रेंडचंसुद्धा असंच काहीसं आहे. तुम्हाला जमेल तशी, घरच्याघरी, कोणाची मदत न घेता बांधता येईल अशी वेणी बांधण्याकडे कल दिसतो. यासाठी तुमचे केस दाट असलेच पाहिजेत, असे काही नाही. मध्यम उंचीचे, स्टेप कट केल्यामुळे कमी-जास्त उंचीचे असतील तरी चालतं. उलट यामुळे वेणीच्या मधून केस बाहेर येऊन मिळणारा ‘मेस्सी लुक’ सध्या ट्रेंडमध्ये आहे. केसातल्या तेलाची जागा आता हेअरस्प्रे आणि जेलने घेतली आहे.
फ्रेंच ब्रेडिंग
फ्रेंच ब्रेडिंग आणि स्पोर्ट यांचं जवळचं नातं आहे. यापद्धतीने बांधलेल्या वेणीतले केस सहसा सुटत नाहीत. तसंच तेल, जेल लावून चापूनचोपून वेणी बांधली तरी छान दिसते. म्हणूनच मदानी खेळ खेळताना, डान्ससाठी, व्यायामादरम्यान अनेक जण ही वेणी बांधतात. फ्रेंच ब्रेडिंगची पद्धत नेहमीच्या तीन पदरी वेणीप्रमाणेच असते, फक्त ती डोक्याच्या वरच्या बाजूपासून सुरू होते. दोन वेण्या पद्धतीने फ्रेंच ब्रेडिंग बांधल्यास त्यास ‘बॉक्सर ब्रेडिंग’ म्हणतात.
मिल्कमेड ब्रेडिंग
डोक्यावर छानसा मुकुट मिरवायला कोणाला आवडणार नाही. मिल्कमेड ब्रेडिंगमध्ये असाच शिरपेच डोक्यात खोवला जातो. नेहमीप्रमाणे दोन वेण्या बांधून घ्या. त्यानंतर एखाद्या मुकुटाप्रमाणे वेण्या डोक्याच्या वरच्या बाजूला एकमेकांमध्ये खोवून घ्या. या खोवलेल्या वेण्यांमध्ये फुलं, टिकल्या, स्टड्स लावून वेणीला उठाव आणता येतो आणि डोक्यावर मुकुट आहे, म्हटल्यावर तरुणी राजकुमारी दिसणार हे नक्कीच.
फिशटेल ब्रेडिंग
या पद्धतीमध्ये पोनीटेल बांधून केसांचे दोन भाग करा. उजव्या भागातून अध्र्या इंचाची केसांची बट घेऊन तिला डाव्या बाजूच्या बटीमध्ये गुंफा. त्यानंतर डाव्या बाजूची बट घेऊन उजव्या बाजूला गुंफा. वेणीच्या टोकापर्यंत हे करत राहा. फिशटेल ब्रेडिंग केसांना फुगीरपणा देतं. त्यामुळे केस दाट नसले, तरी ही वेणी बांधता येते. विशेषत: साइड पार्टशिन करून बांधलेली मेस्सी लुकची वेणी सुंदरच दिसते.
फेदर ब्रेडिंग
फेदर ब्रेडिंगमध्ये वेणी नेहमीप्रमाणे सरळ रेषेत बांधण्याऐवजी आडव्या रेषेत बांधली जाते. ही वेणी दिसायला नाजूक आणि सुंदर असते. तसचं केसांना हायलाइट केलं असल्यास या वेणीमुळे केसांचा रंग फोकसमध्ये येण्यास मदत होते. केसांना वेव्ह आणि किंचित कर्ल्स दिल्यास सिंपल हेअरस्टाइलसुद्धा या वेणीमुळे खुलून दिसते. त्यामुळे बहुतेकदा पार्टी लुकमध्ये हिचा समावेश असतो.ह्ण
वेणी कशी कॅरी कराल?
- वेस्टर्न ड्रेसिंगसोबत साइड पार्टशिन असलेली वेणी बांधा. त्यामुळे चेहऱ्याला फुगीरपणा जाणवत नाही.
- नेहमीचा पोनीटेल बांधण्याऐवजी छोटय़ा बटांच्या दोन-तीन वेण्या बांधा. मोकळे केस आणि वेण्या यांचा एकत्रित पोनीटेल बांधा. अर्धी वेणी आणि अर्धा पोनीटेल असं कॉम्बिनेशन तुम्ही करू शकता. लुकला छोटासा ट्विस्ट मिळतो.
- पारंपरिक लुकसाठी वेणीसोबत परांदा वापरून बघा. परांदा हा पंजाबी संस्कृतीचा महत्त्वाचा भाग आहे. पण एखाद्या दिवशी लांबसडक केस मिरवायचे असतील, तर परांदा बांधून पाहायलाच हवा.
- फ्रिन्जेस सध्या ट्रेंडमध्ये आहेत. पण रोजच्या धावपळीत कानामागे जाऊन फ्रिन्जेसचा आकार बदलतो. अशा वेळी फ्रिन्जेसची लहानशी वेणी बांधू शकता.
अर्थात हे पारंपरिक प्रकार असले तरी यात बाजारात मिळणारे नानाप्रकारचे बो, हेअरबॅण्ड्स, डेकोरेटिव्ह फुलं, मोती, स्डड्स यामुळे तुम्हाला तुमच्या पद्धतीने आणि आवडीनुसार त्याचे स्टायिलग करू शकता. जीन्स, कुर्ता, वन पीस ड्रेस, सलवार कमीज अशा इंडियन तसेच वेस्टर्न कपडय़ांवर साजेशी दिसते.
त्यामुळे केवळ गरज म्हणून नाही तर एक स्टाइल स्टेटमेंट म्हणूनही ही लाखमोलाची वेणी तरुणाईची लाडकी झाली आहे.