ब्लॅकहेड्स ही एक समस्या आहे जी बहुतेक लोकांना त्रास देते. वाढत्या प्रदूषणामुळे आणि धुळीच्या संपर्कामुळे, बहुतेक लोकांच्या चेहऱ्याच्या नाक, गाल किंवा हनुवटी यासारख्या काही भागांवर ब्लॅकहेड्स येऊ लागतात, जे अतिशय कुरूप दिसतात. याशिवाय, यामुळे तुमची त्वचा देखील खूप खडबडीत होते. अशा परिस्थितीत लोकांना आठवड्यातून एकदा पार्लरमध्ये जाऊन त्वचेची स्वच्छता करावी लागते.

मात्र, जर तुम्हालाही या समस्येचा सामना करावा लागत असेल तर आता तुम्हाला यासाठी पार्लरमध्ये जाऊन जास्त पैसे खर्च करण्याची गरज नाही. याशिवाय तुम्हाला हवे असल्यास घरच्या घरी काही सोपे उपाय करून तुम्ही या समस्येपासून मुक्ती मिळवू शकता.

Traffic jam at Jamtha T-point even before start of cricket match
क्रिकेट सामना सुरु होण्यापूर्वीच जामठा टी-पॉइंटवर वाहन कोंडी
Best Vegetables for Vegetarians and Non-vegetarians
Vegetables for Nonvegetarians ‘ही’ भाजी मांसाहार करणाऱ्यांकरता आवश्यक…;…
Hair identifier spray
शेव्हिंग करण्यापूर्वी हेअर आयडेंटिफायर स्प्रेचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते का? वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
Causes of unwanted hair growth
Facial Hair : हनुवटी आणि गालावर भरपूर केस येतात? मग ‘ही’ असू शकतात कारणे; करू नका दुर्लक्ष
How To Make Curd Face pack for dry skin
Curd Face Pack : थंडीत त्वचा कोरडी दिसते? मग दह्याचा ‘हा’ फेसपॅक एकदा लावून तर बघा; सुंदर, मऊ आणि चमकणारी दिसेल तुमची त्वचा
Ambuja Cements Maratha Limestone mine in Lakhmapur Korpana taluka will cause severe pollution affecting nearby villages
चंद्रपूर : अंबुजा सिमेंटच्या लाईमस्टोन खाणीमुळे प्रदूषणात वाढ; दहा ते पंधरा गावांना…
Tata Hospital to start super specialty hospital for cancer
कर्करोग रुग्णांसाठी टाटा रुग्णालय सुरू करणार अतिविशेषोपचार रुग्णालय
dead leopard found in wheat field in Nimbhore Phaltan causing excitement
फलटण परिसरात मृत बिबट्या आढळला, जिल्ह्यात महिनाभरातील चौथी घटना

हेही वाचा – चिमुकल्याचं भलतं धाडस! अजगराला पकडण्यासाठी स्वतःचा जीव घातला धोक्यात; थरारक VIDEO व्हायरल

लिंबाचा रस, हळद आणि दालचिनी

लिंबाचा रस, हळद आणि दालचिनी पावडर ब्लॅकहेड्स दूर करण्यात मदत करू शकते. यासाठी एका मोठ्या चमच्यात दालचिनी पावडर घ्या, त्यानंतर त्यात चिमूटभर हळद आणि ३ ते ४ थेंब लिंबाचा रस घाला आणि पेस्ट तयार करा. आता ही पेस्ट बोटाने नाक आणि ब्लॅकहेड्सच्या भागावर लावा आणि सुमारे १५ मिनिटे कोरडे होऊ द्या. हलक्या ओल्या कापडाच्या किंवा कापसाच्या मदतीने पुसून घ्या.

वास्तविक, हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-सेप्टिक आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात, जे त्वचेला कोणत्याही प्रकारच्या संसर्ग किंवा बॅक्टेरियापासून वाचवतात. त्याच वेळी, दालचिनीमध्ये रक्ताभिसरण सुधारणारे गुणधर्म आहेत. अशा परिस्थितीत ते त्वचेच्या छिद्रांना घट्ट करते. याशिवाय लिंबू छिद्रांना घट्ट करण्याचे काम करते, ज्यामुळे ब्लॅकहेड्स पुन्हा होत नाहीत. अशा परिस्थितीत आठवड्यातून २ ते २ वेळा या पद्धतीचा अवलंब केल्यास तुम्हाला आश्चर्यकारक परिणाम दिसू शकतात.

हेही वाचा – रेस्टॉरंटने दिली ‘या’ ग्राहकांना खास नोटीस! पोस्ट पाहून नेटकरी म्हणाले, “खाऊ नाही शकत तर…”

हळद आणि मध

हळद आणि मध देखील या समस्येपासून मुक्त होण्यास मदत करू शकतात. यासाठी २ ते ३ चमचे मधात अर्धी हळद मिसळून मिश्रण तयार करा. आता हे मिश्रण ब्लॅकहेड्स असलेल्या भागावर फेस मास्कप्रमाणे लावा. सुमारे २० मिनिटे पेस्ट अशीच राहू द्या. यानंतर, वर्तुळाकार गतीने मालिश करून मास्क काढा. आठवड्यातून २ ते ३ वेळा या पद्धतीचा अवलंब केल्याने तुम्ही हट्टी ब्लॅकहेड्सपासून मुक्त होऊ शकता.

मध त्वचेला आर्द्रता देण्याचे काम करते, ज्यामुळे ब्लॅकहेड्स दूर करणे सोपे होते. याशिवाय जंतूंना दूर ठेवण्यासही हे उपयुक्त आहे. चांगल्या परिणामांसाठी, तुम्ही या मास्कमध्ये लिंबाच्या रसाचे दोन ते तीन थेंब देखील घालू शकता. अशाप्रकारे, या दोन अतिशय सोप्या पद्धतींमुळे तुम्हाला पार्लरचा खर्च वाचवण्यास मदत होईलच, आणि तुमची त्वचा अधिक स्वच्छ आणि चमकदार दिसेल.

Story img Loader