Friendship Day 2023 Goa Trip With Friends : मैत्री हे प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातील पहिलं नातं असतं जे तो स्वत: निवडतो. कोणतेही मुलं जेव्हा घरातून बाहेर पडतो तेव्हा एखाद्या अनोळखी व्यक्तीबरोबर त्याचे नातं जुळते किंवा एखादी अनोळखी व्यक्ती आवडते तेव्हा मैत्रीच्या नव्या नात्याची सुरुवात होते. म्हणूनच मैत्रीचं नातं खूप खास असतं.
फ्रेंडशिप डे जवळ आला आहे.मित्र-मैत्रिंणीबरोबर तुमचं नातं आणखी चांगले करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. तुम्ही देखील तुमच्या मित्र-मैत्रिंणीबरोबर फ्रेंडशिप डे साजर करण्यासाठी खास प्लॅन करत असाल? तुम्हाला तुमची मैत्री आणखी खुलवायची असेल, मैत्रीच्या नव्या आठवणी तयार करायच्या असेल तर तुम्ही तुमच्या मित्रांबरोबर या दिवशी फिरायला जाऊ शकता. मित्र-मैत्रिंणीबरोबर फिरण्याची मज्जा काही वेगळी असते. मित्र-मैत्रिंणीबरोबर फिरायचे म्हणजे सर्वांचे आवडते ठिकाण असते गोवा. तुम्ही जरमित्र-मैत्रिंणीबरोबर गोव्याला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर आमच्याकडे तुमच्यासाठी काही भन्नाट आयडिया आहेत.
अगोंडा किल्ला
गोव्यामध्ये असलेला अगोंडा किल्ला १६१२ मध्ये बांधला गेला होता. हे पोर्तुगीजांनी मराठा आणि डच यांच्या हल्ल्यांना रोखण्यासाठी बांधले होते. या किल्ल्यात एक झरा तयार केला होता, ज्याचे पाणी येथून जाणारे-येणारे प्रवासी पितात. इतिहास प्रेमींसाठी, हे ठिकाण एक अतिशय रोमांचक अनुभव देईल.
हेही वाचा – Monsoon Skincare Routine : पावसाळ्यात ग्लोइंग आणि फ्रेश त्वचेसाठी ‘या’ ट्रिक्स फॉलो करायलाच हव्यात!
जीजस चर्च
जुन्या गोव्यात बॅसिलिका बॉन जीझस चर्च आहे, जे सेंट फ्रान्सिस झेवियर यांना समर्पित आहे. या चर्चमध्ये त्यांचे अवशेष ठेवले आहेत. पोर्तुगालच्या राजाच्या सांगण्यावरून तो भारतात आला होता. चर्चच्या अगदी समोर सेंट कॅथेड्रल चर्च आहे, जे आशियातील सर्वात मोठे चर्च आहे.
पालोलम बीच
पालोलम बीच हा गोव्यातील सुंदर समुद्रकिनाऱ्यांपैकी एक आहे. समुद्रकिनाऱ्याच्या आसपास रेस्टॉरंट्स आहेत, जे स्वादिष्ट पदार्थ देतात. समुद्रकिनाऱ्यांचे आनंददायक दृश्य पाहताना येथे तुम्ही स्वादिष्ट भोजनाचा आनंद घेऊ शकता.
हेही वाचा – महागडे गिफ्ट आणि सरप्राइज न देता, ‘असे’ व्यक्त करु शकता तुमचं प्रेम, गर्लफ्रेंड नक्की होईल खुश!
अर्वालेम लेणी
अर्वालेम लेणी गोव्यातील ऐतिहासिक वास्तूंपैकी एक आहे. ही गुहा सहाव्या शतकात बांधली गेली. इतिहासाची आवड असलेल्या लोकांसाठी हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.