best indoor plants for living room: घरात काही खास झाडे लावल्यावर घरात सुख समृद्धी येतेच त्याबरोबर घरातील वाईट दोष नकारात्मक ऊर्जा निघून जाते. अश्या झाडांचे आयुर्वेदात देखील खूप महत्व आहे. या झाडांना घरातील योग्य दिशेला ठेऊन त्यांची काळजी घेतली की त्याचा सकारात्मक प्रभाव आपल्या जीवनावर पडलेला आपल्याला पाहायला मिळतो. सकारात्मक ऊर्जा देणारी, मन शांत आणि प्रफुल्लित करणारी अशी झाडं कोणती हे जाणून घेऊया.
झाडं केवळ घराची शोभा वाढवत नाहीत,तर त्यापासून विविध प्रकारची सकारात्मक ऊर्जा घरातल्या लोकांना मिळते. मनाला शांतता लाभते. रूक्ष आणि वस्तूंनी गजबजलेलं घर हिरव्यागार,सुंदर झाडांमुळे जिवंत वाटतं. अशी झाडं घरामध्ये लावली पाहिजेत. त्यामुळे घरातलं वातावरण आनंदी राहतं,कुटुंबातल्या लोकांना मानसिक शांतता मिळते.
कोरफड
कोरफड हे अशाच प्रकारातलं झाड आहे. वरवर काटेरी दिसणारं हे झाड बहुगुणी असतं. कोरफडीच्या झाडामुळे हवा शुद्ध होते. तसंच झीज भरून काढणारी एकप्रकारची ऊर्जा या झाडामुळे मिळते. त्वचेवरच्या जखमांसाठी किंवा भाजल्यावर कोरफडीचा गर उपयोगी पडतो.
जाईचं फूल
जाईचं फूल पांढऱ्या रंगाचं, सुंगधी फूल असतं. सकारात्मक ऊर्जा आणि आनंद या झाडामुळे मिळतो. शरीराला विश्रांती देणाऱ्या अरोमा थेरपीसाठी याचा नेहमी वापर केला जातो.
रोझमेरी
रोझमेरी ही एक प्रकारची सदाहरित औषधी वनस्पती आहे. या औषधी वनस्पतीला गुलमेंहदी या नावानेही ओळखले जाते. इतर औषधी वनस्पतींपेक्षा रोझमेरी या वनस्पतीमध्ये अधिक तीव्र सुगंध आणि चव असते. या वनस्पतीचा सुगंध हा पुदिन्यासारखा असतो.
हेही वाचा >> Kitchen Jugaad: फक्त ५ मिनिटांत फुगा सोलून देईल ढिगभर लसूण, कसं ते पाहा VIDEO
स्नेक प्लांट
काही अन्य घरगुती उत्पादनाप्रमाणे स्नेक प्लांट घराच्या आतील हवा अर्थात इनडोअर एअर फिल्टर करण्यासाठी फायदेशीर ठरते. हे सुंदर दिसणाऱ्या झाडामध्ये एक विशिष्ट गुण आहे. रात्री झाडातून येणारा कार्बन डायऑक्साईडचा बदल हे ऑक्सिजनमध्ये करते. त्यामुळे बेडरूममध्ये सजावट करण्यासाठी तुम्ही याचा उपयोग करून घेऊ शकता. हवेत स्वच्छता आणि ऑक्सिजन आणण्यासाठी याचा उपयोग होतो.