Viral Video : सध्या पावसाळा सुरू झाला आहे. पावसाळ्यात कपडे कसे सुकवायचे, हा प्रश्न प्रत्येकाला पडतो. तुम्हालाही कपडे कसे सुकवायचे, हा प्रश्न पडतो का? जर हो तर टेन्शन घेऊ नका. तुम्ही फक्त एका चाळणीचा वापर करून पावसाळ्यात कपडे सुकवू शकता. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये चाळणीचा वापर करून कपडे कसे सुकवायचे, याविषयी सांगितले आहेत. आज आपण त्या विषयीच जाणून घेणार आहोत. (best jugaad in monsoon rainy season made clip hanger for dry clothes from old strainer)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे –

सुरुवातीला एक जुनी चाळणी घ्या. त्यानंतर या चाळणीला वरच्या बाजूला आठ छिद्रे पाडा आणि चाळणीच्या खालच्या बाजूला चार छिद्रे पाडा. त्यानंतर दोरा घ्या आणि त्याला प्रत्येक छिद्रामध्ये टाका. दोरी किती लांब ठेवायची हे तुम्ही ठरवू शकता. प्रत्येक दोरीमध्ये कपडे लटकवण्याचा चिमटा घालायचा आणि मेणबत्तीच्या साहाय्याने दोरी सील करून घ्यायची. कपडे लटकवण्याचे हँगर तयार होईल. त्यानंतर वरील चार छिद्रांच्या मदतीने तुम्ही या हँगरला दोरीच्या मदतीने लटकवू शकता. ही भन्नाट ट्रिक पाहून तुम्हीही थक्क व्हाल. अशाप्रकारे तुम्ही फक्त एका जुन्या चाळणीच्या मदतीने कपडे सुकवू शकता. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

हेही वाचा : पाण्यातील व्यायामाने राहा तंदुरुस्त; पोहता येत नसेल तरी करता येतील असे चार व्यायामांचे जबरदस्त फायदे

पाहा व्हायरल व्हिडीओ

हेही वाचा : पावसाळ्यात तुम्हालाही यूटीआयचा त्रास जाणवतोय? जाणून घ्या त्याची लक्षणे आणि योग्य उपचार पद्धती

prajakta_salve_marathi या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “पावसाळ्यात कपडे सुकविण्यासाठी फक्त गाळणीचा वापर करा” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “चाळीस रुपये मीटर ही दोरी. २० रुपयांची चाळणी…… या क्लिप २० रुपयांचे पाकीट. अहो त्या पेक्षा ५० रुपयांमधे मिळते क्लिप हँगर ” काही युजर्सना ही भन्नाट आयडिया आवडली. हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.
प्राजक्ता साळवे या त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून असेच घरगुती उपाय किंवा भन्नाट जुगाडचे व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांच्या प्रत्येक व्हिडीओमध्ये ते नवनवीन माहिती देतात. युजर्स सुद्धा त्यांच्या प्रत्येक व्हिडीओवर भरघोस प्रतिसाद देतात.