Ukhane For Men : उखाणे हा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा एक महत्त्वाचा भाग आहे. लयबद्ध पद्धतीने जोडीदाराचे नाव घेणे, यालाच आपण उखाणा म्हणतो लग्नसराई असो किंवा कोणतेही शुभ कार्य विवाहित स्त्री आवडीने जोडीदाराचे नाव घेत उखाणा घेते. हल्ली महिलांबरोबर पुरुष मंडळी सुद्धा पत्नीचे नाव घेत उखाणा घेतात. अनेकदा इच्छा असूनही पुरुष मंडळी उखाणा पाठांतर नसल्याने पत्नीसाठी उखाणा घेऊ शकत नाही. अशा पुरुषांसाठी आपण काही खास उखाणे जाणून घेणार आहोत. या उखाण्यांच्या मदतीने नवरेदव असो किंवा विवाहित पुरुष पत्नीसाठी उखाणा घेऊ शकणार.

  • समुद्रात छोटीशी होडी, ………… ची आणि माझी लाखात एक जोडी
  • नाशिकची द्राक्षे, नागपूरची संत्री,… झाली आज माझी गृहमंत्री
  • एक होती चिऊ, एक होता काऊ, …. चे नाव घेतो डोकं नका खाऊ
  • ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस, …. तू मला सुपरवूमन वाटतेस
  • ती पुण्याची मिसळ, मी मुंबईचा वडापाव, लग्नाला हो म्हणायला ……… ने खाल्ला जास्तच भाव
  • मटणाचा कला रस्सा, चिकन केले फ्राय; ……… भाव देत नाही किती पण करा ट्राय
  • कृष्णाला बसून राधा हसली, ……. माझ्या ह्रदयात बसली

हेही वाचा : तुमचा नवरा ‘ही’ चाचणी पास होईल का? ‘Husband Test’ महिलांना का वाटते गरजेची, उत्तर मिळाल्यावर पुढे काय?

JNU plans Shivaji centre
छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमीकावा अन् मराठा लष्करी इतिहास, JNU मध्ये आता विशेष केंद्र; कधी सुरू होणार अभ्यासक्रम
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
chhatrapati sambhajiraje swaraj sanghatna
संभाजीराजे छत्रपतींच्या स्वराज संघटनेला ‘महाराष्ट्र स्वराज्य पक्ष’ म्हणून मान्यता; पक्षचिन्हही मिळालं!
platform ticket sales are temporarily restricted at major Mumbai stations
Mumbai Local : वांद्रे स्थानकातील चेंगराचेंगरीनंतर मध्य रेल्वेचा मोठा निर्णय; गर्दी टाळण्याकरता दादर, ठाणे, कल्याणच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना!
government job opportunity MPSC conducted Various exams
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! तब्बल दोन हजार पदांसाठी अर्ज करण्यास काहीच दिवस शिल्लक
Gauri pujan 2024 marathi Ukhane
Gauri Pujan Ukhane 2024 : गौरीच्या ओवशादिवशी घ्या ‘हे’ १० मराठमोळे उखाणे, ऐकताच सगळे होतील खुश
rajeshwari kharat fandry fame actress shares photo with somnath awaghade
‘फँड्री’तील शालू-जब्या गुपचूप लग्नबंधनात? राजेश्वरी खरातच्या ‘त्या’ फोटोवर कमेंट्सचा पाऊस; नेटकरी म्हणाले, “हे कधी झालं…”
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार पडला विवाहसोहळा, फोटो आले समोर
  • खिशात माझ्या प्रेमाची लेखणी, …….. माझी; सर्वात देखणी…
  • रूप तिचे गोड, नजर तिची पारखी, शोधूनही सापडणार नाही… सारखी
  • कृष्णाचे नाव, सारखे माझ्या मुखी, …..ला ठेविन, आयुष्यभर सुखी
  • देव आमचा विठोबा, विठेवरी उभा, ….. ने वाढवली आमच्या घराची शोभा
  • गाडीत गाडी डेक्कन क्वीन… आह माझी ब्युटी क्वीन
  • प्रेमाच्या चौकात किती पण फिरा, शोधून नाही सापडणार……… सारखा हिरा
  • साखरेचे पोते सुईने उसवले, ….. ने मला पावडर लावून फसवले
  • एसटीला म्हणतात लाल परी, …. आह माझ्यासाठी सोनपरी
  • एक बाटली दोन ग्लास, ….. आहे माझी फर्स्ट क्लास

हेही वाचा : तरुणाला आजूबाजूला दिसते करीना; मानसोपचार तज्ज्ञांकडून जाणून घ्या, नेमका हा प्रकार काय?

  • मैदानात खेळत होतो क्रिकेट, ……. पाहून पडली माझी विकेट
  • पाहताच…. ला, जीव झाला येडापीसा, तिच्या शॉपिंगच्या वेडापायी, रिकामा होतो माझा खिसा
  • नंदनवनीच्या कोकिळा बोलती गोड, …… राणी माझा तळहाताचा फोड
  • दारी होते पातेले त्यात होती पळी, ………. आहे माझी खूपच भोळी
  • कोल्हापूरला आह महालक्ष्मीचा वास, …… ला भरवितो श्रीखंडाचा घास
  • गोड मधुर आवाज करी कृष्णाची बासरी, ……… ला घेऊन जातो तिच्या सासरी
  • जाईच्या वेणीला चांदीची तार, माझी… म्हणजे लाखात सुंदर फार

Story img Loader