शरीर निरोगी ठेवण्यासाठी शरीराला प्रोटीनची पुरेशी गरज असते. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशननुसार, पुरुषाला दररोज ५० ग्रॅम प्रोटीनची आवश्यक असतात. महिलांना दररोज ४६ ग्रॅम प्रोटीनची गरज असते. गर्भवती आणि फिडिंग करणाऱ्या महिलांना दररोज ७२ ग्रॅम प्रोटीन आवश्यक असतात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे, त्वचेवर सूज येणे, पोटात सूज येणे, केस कोरडे पडणे, हाडांची झीज होणे अशी लक्षणे शरीरात दिसू लागतात. शरीरात प्रोटीनच्या कमतरतेमुळे हाडे कमकुवत होतात आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो. प्रोटीच्या कमतरतेमुळे यकृताच्या आरोग्यावरही परिणाम होतो. प्रोटीनच्या कमतरतेमुळे यकृतावर चरबी वाढते आणि यकृत फॅटी होते.

( हे ही वाचा: Weight Loss: उपाशीपोटी लसणाचे सेवन केल्याने वजन झपाटयाने कमी होते; पण ‘या’ महत्वाच्या गोष्टीही लक्षात ठेवा)

मांसाहार करणाऱ्यांच्या शरीरात प्रोटीन नसण्याची शक्यता फारच कमी असते. शाकाहारात प्रोटीनयुक्त असे अनेक पदार्थ आहेत, जे शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात सेवन केले जाऊ शकतात.

शाकाहारी लोकांनी डाळीचे सेवन करावे

शाकाहारी व्यक्तींनी आहारात डाळींचे सेवन करावे, याने प्रोटीनची कमतरता पूर्ण होईल. अर्धा कप शिजवलेल्या डाळीमध्ये १२ ग्रॅम प्रोटीन असते जे आपल्या रोजच्या गरजा भागवण्यासाठी उपयुक्त आहे.

( हे ही वाचा: दुधाचा चहा पिणे शरीरासाठी किती चांगले आणि किती वाईट? जाणून घ्या तज्ज्ञ काय सांगतात)

पनीर खा

शाकाहारी लोकांनी त्यांच्या आहारात पनीरचे सेवन करावे. पनीर हा प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. याच्या सेवनाने शरीर निरोगी राहते आणि वजनही नियंत्रित राहते.

ओट्स देखील प्रथिनांचे स्त्रोत आहेत

अर्धा कप ओट्समध्ये ६ ग्रॅम प्रथिने आणि ४ ग्रॅम फायबर, मॅग्नेशियम, झिंक, फॉस्फरस आणि फोलेट असते, जे शरीर निरोगी ठेवते आणि शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करते.

( हे ही वाचा: Side Effects of Paneer: ‘या’ लोकांनी चुकूनही खाऊ नका पनीर; आरोग्यासाठी ठरू शकते घातक)

चिया बिया खा

पोषक तत्वांनी युक्त चिया बियांचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण होते. ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट गुणधर्मांनी समृद्ध, अर्धा कप चिया बियांमध्ये ६ ग्रॅम प्रथिने आणि १३ ग्रॅम फायबर असते. हा लोह, कॅल्शियम, सेलेनियम आणि मॅग्नेशियमचा चांगला स्रोत आहे जो शरीराला निरोगी ठेवतो.

सुक्या फळांचे सेवन करा

आहारातील प्रोटीनची कमतरता भरून काढण्यासाठी सुक्या मेव्याचे सेवन करावे. काजू आणि बदामामध्ये भरपूर प्रथिने असतात, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि प्रोटीनची कमतरता पूर्ण होते. नाश्त्यात तुम्ही ड्रायफ्रुट्सचे सेवन करू शकता.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best protein rich foods for vegeterian people know the list here gps