Jugaad Video Viral : निरोगी जीवनशैलीसाठी आहारात फळांचा समावेश गरजेचा आहे. आरोग्यास पोषक असे फळे खाण्याचा सल्ला डॉक्टर आपल्याला नेहमी देतात. जेव्हा आपल्या शरीरात लोहाचे प्रमाण कमी होते तेव्हा आपल्याला आहारात बीट आणि डाळिंबाचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो पण अनेक लोकांना बीट आवडत नाही त्यापेक्षा लोक डाळिंब आवडीने खातात. (Best Way To Cut & open a Pomegranate know right way watch viral video)

तुम्हाला सुद्धा डाळिंब आवडते का? जर हो तर तुम्ही डाळिंब खाताना ते कसे सोलता? म्हणजेच डाळिंबाच्या आतील बिया कशा काढता? कारण अनेक लोकांना डाळिंबाच्या आतील लाल बिया कशा काढायच्या, हेच माहिती नसते. पण टेन्शन घेऊ नका. सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये डाळिंब कसे सोलायचे, याविषयी माहिती दिली आहे.

हेही वाचा : Stop Throwing Out Banana Strings : केळे खा; पण स्ट्रिंग्स काढून फेकू नका; ‘या’ तीन आरोग्य समस्यांसाठी ठरतील फायदेशीर; वाचा तज्ज्ञ काय म्हणतात

डाळिंब कसे सोलतात? (How To Cut & open a Pomegranate )

या व्हायरल व्हिडीओमध्ये दाखवल्याप्रमाणे –

  • सुरुवातीला एक डाळिंब घ्या व एक चाकू घ्या.
  • त्यानंतर चाकूने डाळिंबला वरच्या बाजूला पाच रेषा ओढा आणि डाळिंबचा वरील भाग काढून घ्या.
  • त्यानंर त्यानंतर पाच भागाला चाकून पाच उभ्या रेषा ओढा. काय आश्चर्य, त्यातील दाणे सहज काढता येईल असे डाळिंबचे पाच भाग झालेले दिसून येईल. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही अवाक् व्हाल.

पाहा व्हायरल व्हिडीओ (Viral Video)

fruitcutting_007 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “खूप सुंदरपणे फळ कापताना”
या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “वाह काय ट्रिक आहे. मी पण ट्राय करेन.” तर एका युजरने लिहिलेय, “छान आम्हीही असंच कापतो.” आणखी एका युजरने लिहिलेय, “मला हे पहिल्यांदा कळले.”

हेही वाचा : महिनाभर दात न घासल्यास शरीरावर काय परिणाम होतात? डॉक्टरांनी सांगितल्या आरोग्याच्या गंभीर समस्या

यापूर्वीही असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहे. काही ट्रिक अनेकदा आपल्याला माहिती नसतात. पण सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या भन्नाट व्हिडीओंमध्ये आपल्याला नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. सोशल मीडियावर असे भन्नाट ट्रिक अनेकदा आपल्याला आश्चर्यचकीत असतात.