तलेजदार त्वचेसाठी अनेकजण स्किन केअर प्रोडक्ट्सचा वापर वापर करतात. अनेक स्कीन केअर प्रोडक्ट्स त्वचा निरोगी आणि चमकदार बनविण्यास तुमची मदत करतात, परंतु प्रत्येक प्रोडक्टची एक्सपायरी डेट योग्य वेळी जाणून घेणे देखील महत्त्वाचे आहे. यावर त्वचारोग तज्ज्ञ डॉ जतिन मित्तल यांनी एखाद्या स्किन केअर प्रोडक्ट्सवर एक्सपायर डेट नसेल तर ते वापरण्यायोग्य आहे की नाही कसे ओळखायचे याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.
डॉ. जतिन मित्तल यांच्या मते, बहुतेक स्किन केअर प्रोडक्ट्सच्या पॅकेजिंगवर ‘एक्सपायरी डेट’ असते. या डेटमुळे तुम्हाला एखादे प्रोडक्ट किती दिवस वापरु शकतो तसेच त्याची क्वॉलिटी किती दिवसापर्यंत टिकून राहू शकते हे समजते. एखादे प्रोडक्ट एक्सपायर झाले तर त्यातून एक विचित्र प्रकारचा गंध येतो, याचा अर्थ ते प्रोडक्ट खराब झाले आहे.
1) स्कीन केअर प्रोडक्ट्सची शेल्फ लाईफ किती दिवस असते?
१) फेस वॉश : सहसा १ ते २ वर्षे
२) मॉइश्चरायझर: १ ते ३ वर्षे
३) सनस्क्रीन: १ ते २ वर्षे
४) टोनर : ६ महिने ते १ वर्ष
५) सीरम: ६ महिने ते १ वर्ष
६) एक्सफोलिएटर : ६ महिने ते १ वर्ष
2) ‘हे’ प्रोडक्ट्स ओपन केल्यानंतर किती दिवसापर्यंत टिकतात
१) रेटिनॉल : २ ते ३ महिने.
२) व्हिटॅमिन सी सीरम: ३ महिन्यांपर्यंत.
३) बेंझॉयल पेरोक्साइड: ३ महिन्यांपर्यंत.
3) …तर क्रीम-सिरम किंवा लोशन वापरु नका
डॉ. जतीन मित्तल यांच्या मते, एखादे प्रोडेक्ट किती काळ सुरक्षित असेल हे तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही त्याचा वास, रंग आणि टेक्सचर याकडे लक्ष दिले पाहिजे. एखाद्या प्रोडक्टला विचित्र गंध येत असल्यास ते न वापरणे योग्य आहे, अशावेळी तुम्ही नवीन प्रोडक्ट खरेदी करणे उत्तम आहे.
4) स्कीन केअर प्रोडक्ट्स लवकर खराब होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?
१) हात स्वच्छता धुवा : प्रत्येक वेळी कोणतेही प्रोडक्ट वापरण्यापूर्वी हात धुणे अत्यंत महत्वाचे आहे. हात स्वच्छ असल्यास तुमच्या त्वचेला कोणताही इजा होणार नाही.
२) प्रोडक्ट्स ज्या ठिकाणी ठेवणार ती जागा स्वच्छ ठेवा: कोणतेही स्कीन केअर प्रोडक्ट स्वच्छ आणि कोरड्या जागी ठेवा, जेणेकरून त्यांच्या क्वालिटीवर परिणाम होणार नाही.
३) चांगले मिक्स करुन वापरा: स्कीन केअर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी त्याची बाटील चांगली शेक करा. यामुळे बाटलीत एका बाजूला जमा झालेले प्रोडक्ट नीट मिक्स होईल.
४) योग्य प्रमाणात वापरा: प्रत्येक प्रोडक्टची कधी आणि किती वापरायचे यासाठी एक लिमिट असते. ते फॉलो करा म्हणजे तुमच्या त्वचेला त्याचा फायदा होईल.
५) ऍलर्जी किंवा इतर समस्यांकडे लक्ष द्या: कोणतेही प्रोडक्ट वापरल्यानंतर तुम्हाला त्वचेवर खाज सुटणे , लालसरपणा किंवा इतर अस्वस्थता जाणवत असल्यास ते ताबडतोब वापरणे थांबवा.
या गोष्टी फॉलो करून तुम्ही तुमचे स्किन केअर प्रोडक्ट दीर्घकाळ टिकवून ठेवू शकता आणि तुमच्या त्वचेला त्याचा बरेच फायदे देऊ शकता.