मुंबईत राहणाऱ्या ६७ वर्षाच्या रमा यांना (नावात बदल) दुपारी एक वाजता फोन आला. फोनवर बोलणारा व्यक्ती म्हणाला..मी बँकेतून बोलतोय.. तुमच्या फोनवर आलेला पिन सांगा.. तंत्रज्ञानाशी अवगत नसललेल्या सुशिक्षित आजींनी त्यांना मोबाईलवर आलेला पिन सांगितला.. पुढच्याच क्षणाला त्यांच्या खात्यावरुन ४० हजारांची रक्कम लंपास झाली.
आणखी एक असाच प्रकार वसईत घडला.. एक ४० वर्षीय व्यक्ती एटीममध्ये पैसे काढण्यास गेली. त्यांनी आपल्या खात्यावरील रक्कम काढली. त्यावेळी कळलं की आपल्या खात्यातून दीड लाख रुपये गायब झाले.. त्यांच्या पायाखालची जमीनच हदरली.. त्यांनी पै पै जमवून घरासाठी ही रक्कम उभी केली होती. काय करावं सूचत नव्हतं. मग पोलिस स्टेशन गाठलं. पोलिसांनी त्यांना बँकेत पाठवलं. बँकेत गेल्यावर कळलं की, गेल्या चार दिवसांत पैसे काढले गेले. पण त्यांनी चार दिवसांमध्ये पैसे काढलेच नव्हते. आपण तर घरीच होतो. मग पैसे काढलं कोणी. त्यांच्या मुलीनं त्यांना शांत केलं आणि थेट पोलिस स्टेशन गाठलं. तिथेही चकरा माराव्या लागल्या. शेवटी पोलिसांनी केस घेतली. पोलिसांनी सांगितलं की, हा क्लोनिंगचा प्रकार आहे. ज्यावेळी एखाद्या ठिकाणाहून तुम्ही पैसे काढत असाल किंवा कार्ड स्वॅप करत असाल तर काळजी घ्यायला हवी. आमच्याकडे अशा दरदोन दिवसाला चार केसेस येतात.
ह्या दोन प्रातिनिधीक केस. पण सर्वसामान्यांचा खिसा रिकामा करणा:या अशा फसवणुकीपासून वाचायचं असेल तर त्यासाठी त्यांचे प्रकारही समजून घ्याव्या लागतील. कारण अनेक प्रकारे फसवणूक होते. त्यातली पहिली पद्धत म्हणजे
– मोबाइलवर एक कॉल येतो. बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर एटीएम किंवा डेबीट कार्डची माहिती विचारली जाते. एटीएम व डेबिट कार्ड ब्लॉक झाल्याचे सांगून खात्याची माहिती घेतली जाते. पुढच्या काही मिनिटांत तुमचे कार्ड पुन्हा सुरू होईल, असे सांगून फोन बंद केला जातो. काही वेळातच आपल्या खात्यातून हजारो रुपए लंपास झाल्याची माहिती मिळते. तेव्हा आपली फसवणूक झाल्याची जाणीव होते.
आणखी एक म्हणजे – क्रेडिट कार्डची लिमिट वाढवून देण्याचे अमिष समोर ठेवून अनेक गुन्हेगार ग्राहकाशी संपर्क साधतात. बँकेचा व्यवस्थापक बोलत असल्याचे सांगून क्रेडिट लिमिट वाढविण्यात येत असल्याचे सांगतात. त्यासाठी कंपनीचा माणूस तुमच्याकडे येईल, त्यास फॉर्म भरून देऊन जुने कार्ड परत करण्याचे सांगतात. फोन करणारा माणूस खरेच क्रेडिट कार्ड कंपनीचा आहे अथवा नाही, याची शहानिशा न करताच आपण त्याने पाठविलेल्या माणसाकडे आपले जुने क्रेडिट कार्ड देतो. या क्रेडिट कार्डवर जगभरात ऑनलाइन खरेदी करून फसवणूक केली जाते.
अशाच पद्धतीमध्ये येतो मोबाइलवरून होणारे व्यवहार. मोबाइलधारक ऑनलाइन पद्धतीने विविध प्रकारचे फ्री अॅप्लिकेशन डाऊनलोड करीत असतात. ते डाऊनलोड करण्यापूर्वी संबंधित कंपनी तुमच्या मोबाइलमधील डाटा वापरण्याची मुभा तुमच्याकडून घेत असते. तुमच्या मोबाइलमध्ये एटीएम कार्ड, ऑनलाईन बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि अन्य पासवर्ड तुम्ही सेव्ह करून ठेवलेले असल्यास त्याची माहिती संबंधित कंपनीकडे जाते. ही माहिती सायबर गुन्हेगारापयर्ंत सहज पोहोचते.
याहीपेक्षा भयंकर म्हणजे एटीएम क्लोनिंग. एटीएमच्या आत (आपण कार्ड स्वॉप करतो तिथं) एक विषेश प्रकारचं डिव्हाईस ठेवलेलं असते. त्याप्रमाणो आपण पिन टाकतो त्याजवळ माइक्रो कॅमराही लावलेला असू शकतो. हा प्रकार जुन्या एटीएमधारकांसोबत अधिक प्रमाणात घडत असल्याचे समोर आलं आहे. अशावेळी आपण खबरदारी म्हणून पैसे काढताना एटीएम व्यवस्थित हाताळावं. मशीनमध्ये एटीएम स्वाईप करताना काळजी घ्यावी. त्याचप्रमाणो पिन टाकाताना आपला दुसरा हात वरील बाजूस ठेवावा. आपला पिन क्रमांक दुस:याला दिसणार नाही याची खबरदारी घ्यावी. कारण, एटीएमला क्लोनिंग करून लाखो रुपये लुटले जातात.
काय घ्यावी खबरदारी
1. मोबाइल फोन बँकिंग करताना जोपयर्ंत तुम्ही तंत्रज्ञानाशी सुसंगत होत नाही, तोवर फोन बँकिंग टाळावे. मोबाइलवर येणारे बँकांचे सर्व कॉल्स टाळावे.
2. जो मोबाइल तुम्ही वापरता तो घरातील इतरही व्यक्ती वापरत असतील, तर मोबाइल
3. बँकिंगचे अॅप डाउनलोडही करू नका. एकूणच मोबाइल बँकिंग पूर्णपणो टाळा.
4. हॉटेल, पेट्रोल पंप, मॉल इत्यादी ठिकाणी बिल क्रेडिट, एटीएम कार्ड आणि डेबिट कार्डद्वारे पैसे भरताना स्वत: ते स्वॅप करावे. त्याचा पासवर्ड कुणालाही देऊ नये.
5. एखाद्या एटीएम मशीनबाबत शंका निर्माण झाल्यास तेथे व्यवहार करू नये.
6. बँकेच्या व्हेरिफिकेशनच्या नावाखाली विचारली जाणारी एटीएम विषयीची माहिती फोनवरून देऊ नये.
7. दर तीन महिन्यांनी बदला पिन नंबर
8. आर्थिक व्यवहार सायबर कॅफेमधून किंवा दुस:याच्या कम्प्युटरवर करू नका.
9. पासवर्ड असे ठेवा की जे सहज ओळखायला कठीण राहतील. शक्यतो डेट ऑफ बर्थ, मोबाईल क्रमांकाचे शेवटचे चार अंक पासवर्ड म्हणून ठेवू नका.
10. डेबीट/क्रेडीट कार्डच्या फोटोकॉपीची प्रत द्यावयाची असेल अशा वेळी फक्त एकाच बाजूची प्रत द्या.
11. एटीएम मशीनमधून पैसे काढल्यानंतर नेहमी कॅन्सल बटन दाबत चला. जेणोकरुन तुमचा एटीएमचा पासवर्ड सुरक्षित राहिल.
कार्ड हरवलं किंवा चोरीला गेल्यास काय कराल
सर्वात आधी तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला फोन करुन कार्ड ब्लॉक करा. जेणोकरुन तुमच्या कार्डचा मिसयूज होणार नाही. कार्ड हारवल्याची तक्रार पोलीस स्थानकातही दाखल करा. यानंतर बँकेत जाऊन कार्ड चोरी झाल्याची माहिती देऊन, नव्या एटीएमसाठी अर्ज करा. नवं एटीएम करताना तुमच्याकडे पोलीस एफआयआरची मागणी केली जाईल, त्यामुळे त्याची एक ङोरॉक्स कॉपीही तुमच्या जवळ ठेवा. तुमच्या ऑनलाईन बँकिंगचा पासवर्ड तत्काळ बदला.
फोनवरून व्यवहार टाळा
माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आता सर्व व्यवहार हे ऑनलाईन झाले आहेत; परंतु काही विकृत मानसिकता असलेल्या व्यक्तीमुळे सायबर क्राईम जगातील अलीकडच्या वर्षात सायबर गुन्हेगारीतदेखील वाढ झाली आहे. बँकेच्या ग्राहकांनी मोबाईल फोनद्वारे व्यवहार टाळावेत. आपला पिन क्रमांक व पासवर्ड कधीच फोनद्वारे किंवा एसएमसद्वारे कोणाशीही शेअर करु नये. दिवसेंदिवस वाढ होत असलेल्या या सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध आणण्याकरिता समाजात जनजागृती करणो गरजेचे आहे. त्याचप्रमाणो महाराष्ट्र सरकारनं डिजिटल साक्षरता वाढवण्यासाठी वार्षिक बजेटमध्ये तरतूद करणो गरजेच आहे.
– अॅड. प्रशांत माळी, सायबर सुरक्षा तज्ञ
पासवर्ड शेअर करू नका, खबरदारी घ्या!
बँकेचे ऑनलाईन व्यवहार, डेबिट क्रेडिट कार्डचा वापर करताना सतर्क राहणो गरजेचे आहे. आपली गोपनीय माहिती कुणालाही शेअर करू नका. सायबर गुन्ह्या सबंधित एखादी तक्रार असल्यास स्थानिक पोलीस ठान्यातील सायबर सेल मध्ये तक्रार करा. नागरिकांनी सतर्कता बाळगणो आणि खबरदारी घेणो आवश्यक आहे.
– अकबर पठाण, उपायुक्त, सायबर पोलीस, मुंबई</p>