भाऊबीजेच्या दिवशी वेगवेगळे पदार्थ बनवणे, रांगोळी सजवणे आणि उरलेली सजावट पूर्ण करणे असा सकाळपासूनच कार्यक्रम सुरू होतो. मात्र आपण इतके व्यस्त असूनही स्वत:ला सजवण्यासाठी नवीन कपडे, तयारी करतो आणि त्यात मेहंदी हा त्याचा अत्यावश्यक भाग आहे. आता मेहंदी काढायची झाली तर ती कोणती काढावी. तसेच मेहंदीचे अनेक प्रकार आहेत. मात्र या प्रकारात आपण पूर्णतः गोंधळून जातो, म्हणून आज आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या मेहंदी डिझाइन्सबद्दल सांगणार आहोत, ज्या तुम्ही तुमच्या वेळेनुसार आणि मेहंदी लावण्याच्या कौशल्यानुसार निवडू शकता.
भारतीय मेहंदी डिझाईन्स
या गोष्टीला नाकारता येत नाही की भारतीय मेहंदी डिझाईन्सला काही तोड नाही. कारण यामध्ये प्रत्येक डिझाइन बारकाईने आणि सुंदरपणे आपल्या हातावर काढली जाते. लग्नाव्यतिरिक्त, दिवाळी, तीज, करवा चौथ यासारख्या इतर अनेक प्रसंगी भारतीय मेहंदी देखील काढली जाऊ शकते. या प्रकारच्या डिझाइनमध्ये हात छान भरलेला दिसतो. यात फ्लोरल, चेकर्ड डॉट्स, ट्रेल्स हे भारतीय मेहंदीमध्ये समाविष्ट केलेले काही विशिष्ट प्रकार आहेत.
Diwali Padwa 2021 Messages In Marathi: दिवाळी पाडव्यासाठी खास संदेश, शुभेच्छा मेसेज
मोरोक्कन मेहंदी डिझाईन्स
मोरोक्कन मेहंदी डिझाईन्स त्यांच्या सुंदर पॅटर्नमुळे ओळखल्या जातात. भौमितिक आकार, रेषांसह आदिवासी डिझाईन्स या मेहंदी डिझाइनला अद्वितीय बनवतात. त्यामुळे तुम्ही देखील या भाऊबीजेला ही मोरोक्कन मेहंदी काढून हाताला सुंदर बनवू शकता.
पाकिस्तानी मेहंदी डिझाईन्स
पाकिस्तानी मेहंदी डिझाईन्समध्ये पाने, फुले, मंडला डिझाईन्स आणि बरेच काही यासारखे नमुने समाविष्ट आहेत. पाकिस्तानी मेहंदी डिझाइनमध्ये, बाह्यरेखा ठळक बनवल्या जातात, ज्यामुळे डिझाइन अधिक सुंदर दिसतात.
अरेबिक मेहंदी डिझाईन्स
अरेबिक मेहंदी डिझाईन्स ही वेली प्रमाणे काढली जाते. ज्यामध्ये मेहंदी काढताना ठळक रेषा आणि रिक्त जागा असल्याने तुमच्या हातावर एक अनोखा लुक मिळतो. त्यात ह्या मेहंदी डिझाईनचे विविध पॅटर्न आहेत. त्यात तुम्ही ही मेहंदी अगदी कमी वेळेत आणि सोप्या पद्धतीने काढू शकतात.
आफ्रिकन मेहंदी डिझाईन्स
आफ्रिकन मेहंदी डिझाईन्समध्ये अनेक पॅटर्न उपलब्ध आहेत. यात हातावर मेहंदी काढताना बोल्ड बॉर्डर आणि बारीक लाइन काढले जातात. मात्र यात मेहंदी काढताना हातभर मेहंदी काढली जात नाही.