Covid-19 Nasal Vaccine Price: भारत बायोटेकच्या नाकावाटे देण्यात येणाऱ्या करोना प्रतिबंधात्मक नेझल लसीची किंमत अखेर जाहीर करण्यात आली आहे. INCOVACC या लसीला काही दिवसांपूर्वीच मंजुरी मिळाली होती. भारत बायोटेकने एका प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, या लसीची किंमत खाजगी रुग्णालयासाठी ८०० रुपये ठरली असून त्यावर ५ टक्के जीएसटी आकारू शकतात. तसंच सरकारी रुग्णालयात या लसीची किंमत ३२५ आकारण्यात येणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जागतिक पातळीवर करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना भारताने कोणत्याही परिस्थितीत तोंड देण्याची तयारी सुरू केली आहे. भारत सरकारने याच अनुषंगाने करोनाच्या नेझल लसीला परवानगी दिली. ही लस जानेवारी महिन्याच्या अखेरीस उपलब्ध होईल. तसंच ही लस सर्वप्रथम खाजगी रुग्णालयांमध्ये उपलब्ध केली जाईल. रिपोर्ट्सनुसार, ज्या व्यक्तींनी दोन डोस घेतले आहेत त्यांना ही लस उपलब्ध होईल.

( हे ही वाचा: Nasal Vaccine म्हणजे काय? ती नक्की कशी काम करते? या बूस्टर डोसमुळे करोनाचा धोका कितपत टळणार, जाणून घ्या)

ही लस कोण घेऊ शकतात?

रिपोर्ट्सनुसार ज्या व्यक्तींचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे ती लोक INCOVACC ही लस घेऊ शकतात. या लसीचा वापर बुस्टर डोस म्हणून केला जाईल. नाकावाटे दिल्या जाणाऱ्या या लसीचे भरपूर फायदे आहेत. करोनाचा विषाणू नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो त्यामुळे ही लस नाक आणि श्वसन मार्गाचे रक्षण करते.

विश्लेषण: आजपासून भारतात उपलब्ध होणार iNCOVACC नेजल व्हॅक्सिन; जाणून घ्या कोणाला घेता येणार ही लस, कुठे करावी नोंदणी

नेझल लसीसाठी कुठे आणि कशी नोंदणी कराल?

नेझल लस आजपासून CoWIN ॲपवर उपलब्ध झाली आहे. तुम्ही CoWIN अकाऊंटमध्ये साइन इन करून नेझल लसीसाठी नोंदणी करू शकता. ही लस सर्वात आधी खाजगी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असेल आणि जानेवारी महिन्यापासून या लसीला सुरुवात होईल.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bharat biotech covid vaccine price gst hospital charge government and private hospital price full details gps