भाऊबीज हा सण भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक आहे. कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी हा सण साजरा केला जातो. या दिवशी बहिणी आपल्या भावांना टिळक लावतात आणि त्यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि आनंदी आयुष्यासाठी प्रार्थना करतात. यावेळी ६ नोव्हेंबरला भाऊबीज साजरी होणार आहे.शुभ मुहूर्तावर बहिणी भावाला टिळक लावतात. त्यानंतर भावाची आरती केली जाते आणि भाऊ बहिणींना भेटवस्तू देतात.
भाऊबीज पूजा मुहूर्त
वेळ – दुपारी १.१० ते दुपारी ३.२१
कालावधी – ०२ तास ११ मिनिटे
( हे ही वाचा: भाऊबीजेनिमित्त ‘बेस्ट’कडून महिलांना खास दिवाळी गिफ्ट; चालवणार विशेष एसी बस )
भाऊबीजेशी संबंधित पौराणिक कथा
मान्यतेनुसार, या दिवशी मृत्यूचा देव यमराज आपली बहीण यमुनेकडे तिने अनेकवेळा बोलावल्या नंतर तिच्या भेटीला गेला होता. यमुनेने यमराजाला भोजन दिले आणि टिळक करून त्यांच्या सुखी आयुष्यासाठी प्रार्थना केली. प्रसन्न होऊन यमराजांनी बहीण यमुना यांना वरदान मागायला सांगितले. यमुना म्हणाली की तू दरवर्षी या दिवशी माझ्या घरी ये आणि या दिवशी जी बहीण आपल्या भावाला टिळक करेल ती तुला घाबरणार नाही. यमराजाने यमुनेला वरदान दिले. या दिवसापासून भाऊबीज उत्सवाला सुरुवात झाली असे म्हणतात.