Bhaubeej 2022 Gift Ideas for Brother : दिवाळीनंतर भाऊबीज साजरी केली जाते. भाऊबीज हे भाऊ आणि बहिणीतील अतूट नात्याला अजून सुरक्षित करणारे सण आहे. या दिवशी बहीण आपल्या भावाला दीर्घायुष्य लाभण्यासाठी, त्याच्या उज्जवल भविष्यासाठी पूजा करते. या दिवशी भाऊ बहीण दोन्ही एकमेकांना भेटवस्तू देतात, गोड भरवतात. पण यंदा भाऊबिजेला बहिणीला कोणती भेटवस्तू द्यावी, याचे उत्तर तुम्हाला मिळत नसेल तर काळजी करू नका. आम्ही तुम्हाला काही भेटवस्तू सूचवत आहोत. या भेटवस्तू तुम्ही तुमच्या बहिणीला दिल्यास तिला खूप आनंद होईल.

१) सौंदर्य प्रसाधने

Vivah muhurat 2025 Marriage Dates in 2025 Hindu Panchang
Vivah Muhurat 2025 : नवीन वर्ष २०२५ मध्ये विवाहासाठी किती शुभ मुहूर्त, पाहा जानेवारी ते डिसेंबरपर्यंतच्या तारखांची यादी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
swapan sashtra dream interpretation about money gold silver
स्वप्नात भरपूर पैसा, सोन्या-चांदीचे दागिने दिसणे शुभ की अशुभ? जाणून घ्या काय सांगतं स्वप्नशास्त्र
Todays Horoscope 9 November In Marathi
९ नोव्हेंबर पंचांग: कष्टाचे फळ, कुटुंबात गोडवा ते जोडीदाराचा सहवास; तुमचा शनिवार जाणार का आनंद-उत्साहात? वाचा १२ राशींचे भविष्य
Numerology: People Born on These Dates Are Blessed by Lord Shani
‘या’ तारखेला जन्मलेल्या लोकांवर असते नेहमी शनि देवाची कृपा
Marathi Actress Shivani Sonar Share Special Post For mother on 50th birthday
“अशीच वेडी राहा…” म्हणत शिवानी सोनारने आईला ५०व्या वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा, होणारा नवरा अंबर गणपुळे कमेंट करत म्हणाला…
After 30 years Saturn-Venus alliance will happen
३० वर्षांनतर शनी-शुक्राची होणार युती! २०२५ मध्ये ‘या’ राशींची होणार चांदी, मिळणार अपार पैसा
shani gochar
Shani Gochar 2024 : ३० वर्षानंतर शनि बनवणार दुर्लभ राजयोग, २०२५ पर्यंत ‘या’ राशींना मिळणार पैसाच पैसा!

महिलांना सौदर्य प्रसाधने खूप आवडतात. त्वचेला उजळ मिळवण्यासाठी, कार्यक्रम, उत्सव प्रसंगी सुंदर आणि आकर्षक दिसण्याकरिता महिला या वस्तूंचे वापर करतात. तुम्ही तुमच्या बहिणीला सौदर्य प्रसाधने भेटवस्तू म्हणू देऊ शकता. याने तिला आनंदी होईल.

(जेवताना ‘या’ ४ गोष्टी लक्षात ठेवा; अपचन, ढेकर आणि इतर समस्यांपासून मिळेल आराम)

२) हँडबॅग

तुमची बहीण कॉलेज किंवा ऑफिसला जात असेल तर हँडबाग ही तिच्यासाठी चांगली भेटवस्तू ठरू शकते. हँडबॅगमध्ये ती तिच्या दैनंदिन उपयोगात येणाऱ्या छोट्या वस्तू ठेवू शकते आणि त्या बाहेर कधीही वापरू शकते. हँडबॅगमध्ये तिला मोबाईल देखील ठेवता येईल. या भाऊबिजेला तुम्ही आपल्या बहिणीला हँडबॅग भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

३) स्मार्टवॉच

बहिणीला भेटवस्तू म्हणून तुम्ही स्मार्टवॉच देऊ शकता. आता स्मार्टवॉच केवळ वेळच दाखवत नाही तर त्यातील आरोग्यासंबंधी फीचर तुमच्या बहिणीला निरोगी ठेवण्यात फायदेशीर ठरू शकतात. तसेच, स्मार्टवॉच ब्ल्युटूथ कॉलिंगची देखील सुविधा देते. ती दिसायलाही आकर्षक असते. हे गिफ्ट तुमच्या बहिणीला फार आवडेल.

(Strong bones : हाडांना द्या बळकटी, कॅल्शियमसाठी ‘या’ पदार्थांचे करा सेवन)

४) ज्वेलरी

महिलांना दागिने फार आवडतात. दागिने महिलांच्या सुदरतेत आणखी भर घालतात. तुमचे बजेट मोठे असेल तर तुम्ही आपल्या बहिणीला सोन्या चांदीचे दागिने भेटवस्तू म्हणून देऊ शकता. तुमचे बजेट कमी असल्यास तुम्ही आर्टिफिशयल ज्वेलरी देखील भेटवस्तू म्हणून देऊ शकता.

५) पादत्राणे

तुमच्या बहिणीला सुंदर, मऊ, पायाला आराम देईल असे पादत्राणे आवडत असतीत तर तुम्ही ते भेटवस्तू म्हणून देऊ शकता. बाजारात अनेक पादत्राणे उपलब्ध असतात. त्यापैकी चांगले तुमच्या बहिणीला आवडेल असे पादत्राणे तुम्ही तिला भेटवस्तू म्हणून देऊ शकते.