Bhaubeej 2024 Unique Gift Ideas : सध्या सगळीकडे दिवाळीची जय्यत तयारी सुरू आहे. बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी लोक गर्दी करताहेत. मिठाई, दागदागिने, कपडे, भेटवस्तू, डेकोरेशनचे सामान खरेदी करताना लोक दिसताहेत. दिवाळीतील भाऊ बहि‍णीच्या पवित्र व अतूट नात्याचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी बहीण भावाला ओवाळते आणि भावाला छान गिफ्ट देते. यंदा तुम्ही तुमच्या भावाला काय गिफ्ट देणार आहात?
खरं तर भाऊबीजेला भावाला नवीन हटके अशी कोणती भेटवस्तू द्यावी, असा प्रश्न प्रत्येक बहिणीला पडतो पण टेन्शन घेऊ नका. आज आपण अगदी ५०० रुपयांपासून काही असे हटके भेटवस्तूंचे पर्याय जाणून घेणार आहोत.

५०० रुपयापर्यंत गिफ्ट

पाकिट – तुम्हाला ३०० ते ५०० रुपयांपर्यंत चांगले पाकिट मिळेन.

Woman driving BMW steals flower pot from outside Noida shop, video goes viral
“अशा श्रीमंतीचा काय उपयोग?” आलिशान बीएमडब्ल्यूमधून आलेल्या महिलेचं रात्री १२ वाजता लाजीरवाणं कृत्य; VIDEO व्हायरल
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कुणासमोरही झुकत नाही; प्रचंड स्वाभिमानी असतात, जाणून घ्या स्वभाव
chia seeds health benefits soaked chia seeds benefits and direction to use
रोज चिया सीड्स खाण्याचे हे आहेत आरोग्य फायदे, वाचा कशाप्रकारे करावे सेवन
Bhau Beej 2024 Date Time Shubh Muhurat Rituals in Marathi
Bhau Beej 2024 Date Shubha Muhurat: २ की ३ नोव्हेंबर, केव्हा साजरी केली जाणार भाऊबीज? जाणून घ्या तिथी, महत्त्व आणि भावाचे औक्षण करण्याची योग्य वेळ
Bhaubeej 2023 Gift Ideas in Marathi
Bhaubeej 2023 Gift Ideas: भाऊबीजेला भावाला काय गिफ्ट द्यायचं हा प्रश्न पडलाय? मग पर्यायांची ही यादी एकदा पाहाच!
tomato rice
रोज रोज भाजी-पोळी खाऊन कंटाळला आहात? मग आज बनवा टोमॅटो पुलाव तेही झटपट
तांदळाचे बोर
दिवाळी स्पेशल फराळ! ‘या’ दिवाळीत बनवा हटके पदार्थ, जाणून घ्या कसे बनवावे तांदळाचे बोर

पेन आणि डायरी – जर तुमच्या भावाला लिहायची आवड असेल तर तुम्ही त्याला छान डेकोरेटिव्ह डायरी गिफ्ट देऊ शकता.

फोन कव्हर – २०० ते ३०० रुपयांपर्यंत तुम्हाला छान हटके फोन कव्हर मिळू शकते.

किचेन – जर तुमच्या भावाकडे सायकल किंवा दुचाकी असेल तर तुम्ही त्याला सुंदर किचेन गिफ्ट देऊ शकता.

जुन्या फोटोंचा कोलाज – तुमच्या भावांबरोबर काढलेले तुमचे जुने फोटो असेल त्या फोटोंचा कोलाज तुम्ही देऊ शकता.

परफ्यूम – भावाला आवडता परफ्युम देऊ शकता.

बॉडी स्प्रे – बॉडी स्प्रे सुद्धा एक चांगला पर्याय आहे.

पुस्तक – जर तुमच्या भावाला पुस्तक वाचायची आवड असेल तर तुम्ही त्याला पुस्तक गिफ्ट देऊ शकता.

टी – शर्ट – ५०० रुपयांपर्यंत तुम्ही चांगले टी – शर्ट गिफ्ट देऊ शकता.

टिफीन बॉक्स – टिफीन बॉक्स सुद्धा तुम्ही भावाला गिफ्ट देऊ शकता.

फोन स्टँड अँड होल्डर – फोन स्टँड आणि होल्डर हे सुद्धा गिफ्ट तुम्ही देऊ शकता.

सेल्फी स्टिक – जर तुमच्या भावाला फिरायला जायची आवड असेल तर सेल्फी स्टिक द्या.

डेकोरेटिव्ह चहाचा कप – भावाचा फोटो किंवा भावाबरोबर तुमचा फोटो लावून डेकोरेटिव्ह चहाचा कप गिफ्ट देऊ शकता.

फन गेम – जर तुमच्या भावाल गेम खेळायची आवड असेल तर तुम्ही त्याला एखादा फन गेम गिफ्ट देऊ शकता.

ब्रासलेट – ब्रासलेट घालायला आवडत असेल तर तुम्ही ब्रासलेट सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

बॉटल – तुम्ही हटके बॉटल सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

ग्लेअर – मुलांना ग्लेअर घालायला आवडते. तेव्हा तुम्ही हटके ग्लेअर (चष्मा) सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

कॅप – जर कॅप घालायला आवडत असेल तर तुम्ही त्याला कॅप सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

प्रोटिन शेकर – जर तुमचा भाऊ नियमित जिमला जात असेल तर तुम्ही प्रोटिन शेकर सुद्धा देऊ शकता.

बेल्ट – ५०० रुपयांपर्यंत तुम्ही चांगला बेल्ट सुद्धा भावाला देऊ शकता.

हेही वाचा : TikTok trends: गर्भधारणेसाठी काही स्त्रिया सर्दीचे औषध का घेतात? ते परिणामकारक आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?

१००० रुपयांपर्यंत गिफ्ट

फोटो फ्रेम – तुमच्या बरोबरचा तुमच्या भावाचा सुंदर मोठा फोटो फ्रेम करून तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

इअरबड्स/इअरफोन्स – इअरबड्स/इअरफोन्स पण तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

घड्याळ – वेगवेगळ्या कंपन्यांच्या घड्याळ पण तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

शर्ट – हजार रुपयांपर्यंत तुम्ही एखादे छान शर्ट तुमच्या भावाला गिफ्ट देऊ शकता.

कुर्ती – कुर्ती घालायला आवडत असेल तर तुम्ही कुर्ती सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

मेकअप सेट – तुम्ही तुमच्या भावाला खास मेन्स स्पेशल मेकअप सेट गिफ्ट देऊ शकता.

स्किन केअर सेट – स्किन केअर सेट सुद्धा देऊ शकता.

गिफ्ट वाउचर – तुम्ही १००० रुपयांचे गिफ्ट वाउचर सुद्धा देऊ शकता.

हेडफोन – जर तुमच्या भावाला गाणी ऐकायला आवडत असेल तर हेडफोन सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

ट्रिमर – ट्रिमर ही अत्यंत गरजेची वस्तू आहे.

जिम बॅग – तुमचा भाऊ जिमला जात असेल तर तुम्ही जिम बॅग सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

हूडी/जॅकेट – हूडी किंवा जॅकेट सुद्धा तुम्ही तुमच्या भावाला गिफ्ट देऊ शकता.

शेव्हिंग किट – शेव्हिंग किट सुद्धा तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

मोबाईल रिचार्ज – तीन महिन्याचा तुम्ही रिचार्ज करू शकता.

ओटीटी मेंबरशिप – जर तुमच्या भावाला ओटीटी वरील सिनेमा किंवा वेबसिरीज बघायची आवड असेल तर तुम्ही ओटीटी मेंबरशिप गिफ्ट देऊ शकता.

हेही वाचा : Diwali 2024 : दिवाळीआधी ‘या’ सोप्या पद्धतीने न थकता करा संपूर्ण घराची साफसफाई

महागडे गिफ्ट

मोबाईल फोन – महागड्या वस्तू मध्ये तुम्ही त्याला एखादा नवीन लाँच झालेला फोन गिफ्ट देऊ शकता.

स्मार्ट वॉच – महागडी स्मार्ट वॉच गिफ्ट देऊ शकता.

जिम मेंबरशिप – याशिवाय तुम्ही तुमच्या भावासाठी जिम मेंबरशिप खरेदी करू शकता.

शूज – जर तुमच्या भावाला शूज कलेक्शनची आवड असेल तर तुम्ही एखाद्या ब्राण्डेड कंपनीचे शूज गिफ्ट करू शकता.

व्हिडीओ गेम – व्हिडीओ गेम गिफ्ट देऊ शकता.

स्पीकर – स्पीकर सुद्धा तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

अंगठी – सोन्याची किंवा चांदीची अंगठी सुद्धा तुम्ही गिफ्ट देऊ शकता.

होम जिम किट – होम जिम किट सुद्धा तुम्ही गिफ्ट करू शकता

सायकल – याशिवाय तुम्ही तुमच्या भावाला एखादी सायकल सुद्धा गिफ्ट देऊ शकता.

Story img Loader