5 Types Puri Recipe : सणासुदीच्या निमित्ताने किंवा घरात काही कार्यक्रम असेल तर अनेकदा पुरी – भाजीचा बेत आखला जातो. रोज पोळ्या खाऊन कंटाळा आल्यासही अनेक गृहिणी झटपट पुऱ्या बनवतात. पुरीने जेवणाचा तर स्वाद वाढतोत पण आणि वेळ वाचतो. पण नेहमी आपण गव्हाच्या पिठाच्या पुऱ्या खात आलोय. त्यामुळे खास तुमच्यासाठी पुऱ्यांचे ५ वेगवेगळे प्रकार घेऊन आलो आहेत. पुऱ्यांचे हे प्रकार पौष्टिक असण्याबरोबरच चविष्ठ आणि रुचकर आहेत. आपण पुऱ्यांचे ५ वेगळे प्रकार कशाप्रकारे बनवायचे रेसिपी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेथी बाजरा पुरी बनवण्याचे साहित्य आणि कृत्ती

बाजरीच्या पिठामध्ये थोडेसे गव्हाचे पीठ घ्या आणि त्यात थोडे मीठ, तेल, हळद, लाल तिखट, ओवा, जिरे, ताजी कापलेली मेथी मिक्स करून हे पीठ चांगल्याप्रकारे मळून घ्या. अर्धा तास हे पीठ तसंच ठेवा. त्यानंतर याचे गोळे करून घ्या आणि पुरी लाटून घ्या आणि ती तेलात तळा. तुम्ही गरमागरम रस्सा भाजी किंवा चिकनच्या रस्स्याबरोबर ही पुरी खाऊ शकता.

भेडवी पुरी बनवण्याचे साहित्य आणि कृत्ती

भेडवी पुरी बनवण्यासाठी एका वाटी गव्हाचे पीठ घ्या. त्यात वाटलेली उडीद डाळ, ओवा, लाल तिखट, हळद, मिरचीची पेस्ट, मीठ टाकून तेल आणि पाण्याने हे पीठ चांगल्याप्रकारे मळून घ्या आणि अर्धा तास तसेच ठेवा. यानंतर नॉर्मल गोळे करून पुऱ्या लाटून घ्या. या पुऱ्या तेल गरम करून त्यात तळून घ्या. ही पुरी हिरवी चटणी, सॉसबरोबरही खाऊ शकता.

क्रिस्पी मसाला पुरी बनवण्याचे साहित्य आणि कृत्ती

क्रिस्पी मसाला पुरी अनेकांना ठाऊकच असेल. ही पुरी बनवण्यासाठी एक वाटी गव्हाचे पीठ, मीठ, लाल मिरची पावडर, ओवा, तेल घालून पीठ घट्ट भिजवून घ्या. त्यानंतर साधारण अर्धा तास पीठ तसेच ठेवा. यानंतर याचे गोळे करून पातळ लाटा आणि मग तेलात तळा. या पुऱ्या कुरकुरीत आणि चविष्ठ असतात. चहा अथवा कॉफीसह तुम्ही ही पुरी खाऊ शकता.

पालक पुरी बनवण्याचे साहित्य आणि कृत्ती

अनेकांना पालक भाजी आवडत नाही. अशावेळी तुम्ही गरमागरम पालक पुरी बनवू शकता. यासाठी सर्वप्रथम पालक पाण्यात उकळून घेत त्याची पेस्ट करून घ्या. या पेस्टमध्ये तुम्ही ओवा, हिरव्या मिरची, काळी मिरी आणि मीठ घालून पुन्हा बारीक पेस्ट करा. त्यानंतर एका परतीत गव्हाचे पीठ, तेल, मीठ घ्या. त्यात पालकाची पेस्ट टाका. यानंतर पाणी न वापरता पीठ व्यवस्थित मळून घ्या. पीठाचा गोळा तेल लावून व्यवस्थित मळा आणि अर्ध्या तास तसाच ठेवा. यानंतर तुम्ही गोळे करून पुऱ्या तयार करा तेलात तळून गरमागरम खायला द्या. चटणी अथवा सॉससह पालक पुरी खाऊ शकता.

बीट आणि चणाडाळीची पुरी बनवण्याचे साहित्य आणि कृत्ती

पौष्टिक आणि चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा झाल्यास तुम्ही बीट आणि चणा डाळीपासून बनवलेली पुरी नक्की ट्राय करु शकता. यासाठी रात्रभर चणाडाळ पाण्यात भिजवत ठेवा. यानंतर सकाळी उठल्यावर बीटाचे बारीक तुकडे करा आणि ते चणाडाळबरोबर एकत्र उकळून घ्या. दुसरीकडे एका परातीमध्ये रवा आणि गव्हाचे पीठ घ्या. त्यात थोडे मीठ जिरे, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, चिरलेली कोथिंबीर टाका आणि त्यात वरील उकळलेले मिश्रण घालून व्यवस्थित भिजवून घ्या. यातही तुम्हाला पाणी वापरण्याची गरज नाही. उकळलेल्या बीट आणि चणाडाळीतील पाण्याने हे पीठ व्यवस्थित मळून घ्या. नंतर अर्ध्या तास तसेच ठेवा आणि त्याचे लहान गोळे करून पुरीच्या आकारात लाटा आणि मग तळा. यानंतर सॉस आणि चटणीबरोबर ती सर्व्ह करा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bhedavi puri meth bajra puri crispy masala puri beetroot and chana dal puri palak puri 5 types of puri recipes for snacks in marathi sjr