मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करण्यात येणारा सण म्हणजे भोगीचा सण. भोगी हा इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण आहे. हा सण जानेवारीत मध्यान्हात येतो. भोगी शब्दाचा शब्दशः अर्थ आहे आनंद घेणारा वा उपभोगणारा! भोगी हा आनंदाचा आणि उपभोगाचा सण म्हणून मानला जातो. या दिवशी सकाळी घर तसेच घरा सभोवतालचा परिसर स्वच्छ केला जातो. दरवाजासमोर रांगोळी काढतात. घरातील सर्व जण अभ्यंग स्नान करून नवीन कपडे परिधान करतात. या दिवशी आंघोळीच्या पाण्यात तीळ टाकण्याची पद्धत आहे. त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात. सासरच्या मुली भोगी सणासाठी या दिवशी माहेरी येतात.

या दिवशी काही राज्यांमध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते. हिवाळ्याच्या सीजमध्ये सर्व प्रकारच्या भाज्या येतात. शेताला नवीन बहार आलेला असतो. म्हणूनच या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतात. या पदार्थांमधून उष्णता मिळते.

tulja bhavani shakambhari navratrotsav loksatta news
शाकंभरी नवरात्र महोत्सव : सहाव्या माळेला महिषासूरमर्दिनी अलंकार महापूजा
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
raj Thackeray
…अन् राज ठाकरे यांनी घरी बोलावले; गंधर्व कलामंचच्या कलाकारांचे कौतुक
Tuljabhavani Devi procession of goddess carried out on tiger vehicle
शाकंभरी नवरात्र महोत्सव, दुसर्‍या माळेला तुळजाभवानी देवीची रथअलंकार महापूजा
What Uday Samant Said?
Uday Samant : उदय सामंत यांच्या हाती मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याची अधिसूचना; म्हणाले, “आज अत्यंत आनंदाचा दिवस..”
loksatta lokankika
सर्वोत्कृष्ट एकांकिकांचा आज नाट्योत्सव, उरणमधील जेएनपीएच्या सभागृहात सादरीकरण
Ahilyanagar Mahakarandak
Ahilyanagar Mahakarandak : जानेवारीत रंगणार मानाची ‘अहिल्यानगर महाकरंडक’ राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा
Using radar-based technology to solve traffic problems in Pune
पुणेकरांसाठी नवे वर्ष कोंडीमुक्त! पोलीस आयुक्तांचा संकल्प; वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ‘रडार बेस टेक्नोलॉजी’चा वापर

(हे ही वाचा – मकर संक्रांतीच्या दिवशी तीळ आणि गुळाचे का करतात सेवन? जाणून घ्या)

आहेत वेगवेगळी नाव

संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो. या सणाला भारतभर वेगवेगळी नावे आहेत. तामिळनाडूत हा सण ‘पोंगल’ तर आसाम मध्ये ‘भोगली बिहू’ ,पंजाब मध्ये ‘लोहिरी’, राजस्थान मध्ये ‘उत्तरावन’ म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जुन्या वाईटचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगिकारल्या जातात.

(हे ही वाचा – Makar Sankranti: हलव्याच्या दागिन्यांनी खुलवा तुमचे सौंदर्य)

बनवली जाते खास भाजी

या सणाला सर्व प्रकारच्या भाज्या एकत्र करून तयार केलेली भोगीची भाजी खालली जाते. या भाजीमध्ये प्रामुख्याने हरभरा, पावटा, घेवडा, वांगे, गाजर, कांद्याची पात, शेंगदाणा, वाटाणा, चाकवत, फ्लॉवर आदी भाज्या वापरल्या जातात. तीळ लावलेली बाजरीची भाकरी करण्याचीही परंपरा आहे. भोगीची भाजी करण्याच्या पद्धतीत थोडाबहुत फरक असतो. बाजरी आणि तिळामध्ये उष्णता असल्याने या दिवशी या तीळ लावलेली बाजरीची भाकरी आणि भोगीची भाजी खाण्याची पद्धत आहे. तसेच भोगीची भाजीही तिळाचा कूट घालून केली जाते.

यवतमाळ येथील एका कलावंताने एका तिळाचे १०० तुकडे केलेत. कोण आहे हा महाशय ?पाहणार आहोत व्हिडीओच्या माध्यमातून…

पुसद येथील अभिषेक सूर्यकांत रुद्रवार या मनस्वी कलावंताने एकाच तिळाचे ब्लेडच्या पात्याने १६ मिनिटं २० सेकंदात चक्क शंभर तुकडे करत रेकॉर्ड केला.

Story img Loader