Bhumi Pednekar Weight Loss Tips: बॉलिवूडमध्ये आजपर्यंत अनेक कलाकारांनी वजन कमी जास्त करून वेगवेगळ्या भूमिका पार पाडल्या आहेत. ही वजनाची गणिते बॉलिवूडला नवीन नाहीत. पण बहुतांश वेळा वजन कमी- जास्त करायच्या वेळी या सेलिब्रिटींच्या मागे न्यूट्रीशिनिस्ट, जिम ट्रेनर, योगा गुरु सगळी टीम तयार असते. पण या सगळ्याशिवाय एका अभिनेत्रीने तब्बल ३२ किलो वजन कमी करून सर्वांनाच चकित केले होते. ही अभिनेत्री म्हणजे भूमी पेडणेकर. भूमीने दम लगाके हैशा सिनेमानंतर ८७ किलोवरून ५७ किलोवर आणले होते. या वेटलॉसच्या प्रवासात कोणतेही डाएट फॅड न पाळता भूमीने वजन कसे कमी केले हे आपण जाणून घेऊयात..
भूमीने ३२ किलो वजन कमी करताना शस्त्रक्रिया केली नव्हती किंवा फॅड डाएट पाळले नव्हते. भूमीने नियमित आहाराचे पालन करताना तिच्या कार्बोहायड्रेटचे सेवन नियंत्रित केले. तिने पोर्शन कंट्रोल म्हणजेच आहाराच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवण्याचा पवित्रा स्वीकारला होता. भूमी कधीही आहारतज्ञ किंवा पोषणतज्ञांकडे गेली नाही परंतु शारीरिकदृष्ट्या सक्रिय होती. नियमित व्यायाम व घरी शिजवलेले साधे जेवण या दोन गोष्टींच्या जोरावर भूमीने आपला पूर्ण लुक बदलला होता.
हे ही वाचा<< तुमच्या उंचीप्रमाणे तुमचे वजन किती असायला हवे? Perfect बॉडी साठी पाहा सोप्पा तक्ता
दरम्यान, अलीकडेच एका सर्वेक्षणात TLC डाएटला सर्वोत्कृष्ट डाएटच्या यादीत पाचवे स्थान देण्यात आले होते. या डाएटमध्ये सुद्धा आहाराच्या नियंत्रणावर भर देण्याचा सल्ला दिलेला आहे. टीएलसी डाएटनुसार, कॅलरीयुक्त पदार्थ आहारातून पूणर्पणे न वगळता त्याचे प्रमाण मर्यादित ठेवायला हवे. शरीराची कॅलरीजची गरज फॅट्सच्या माध्यमातून २५ ते ३५ टक्के पूर्ण करायला हवी.