भारतामधील अग्रेसर कार निर्माती पनी होंडा कार्स इंडिया लिमीटेड (HCIL), ने आज येणाऱ्या ‘नवरात्री’ च्या शुभकाळासाठी भारतभरातील ग्राहकांसाठी ‘दि ग्रेट होंडा फेस्ट’ अंतर्गत काही ऑफर्स घोषित केल्या आहेत. या फेस्टिव्हल अंतर्गत, ग्राहक ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत होंडाच्या सर्व अधिकृत डिलरशीप मध्ये त्यांच्या आवडत्या होंडा कारची खरेदी करताना आकर्षक ऑफर्सचा लाभ घेऊ शकतात.

आकर्षक ऑफर्स बद्दल बोलताना, होंडा कार्स इंडिया लिमीटेडचे मार्केटींग आणि विक्री विभागाचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि संचालक श्री. राजेश गोएल म्हणाले, “उत्सव आपल्याला अनेक गोष्टी साजरे करण्याचे कारण देतात आणि नेहमीच सणासुदीची आपल्या जीवनात विशेष जागा असते. या उत्सव काळात आम्ही कार खरेदी अधिकच चांगली होण्यासाठी , काळात भरपूर आनंद मिळावा याकरिता आमच्या संपूर्ण होंडा कारवर आकर्षक ऑफर्स आणि सवलत देत आहोत.” ते पुढे म्हणाले, “ग्राहकांमध्ये झालेले बदल आणि सध्याची विक्रीची गती यांनी मार्केटमध्ये आमच्या कारची उत्तम मागणी असल्याचे सिद्ध केले आहे. एकूणच ऑटो उद्योगामध्ये आवश्क वाढ या उत्सव कालावधीत मिळेल अशी आशा आहे.”

Anil Aggarwal Success Story
Success Story : तब्बल नऊ वेळा अपयश येऊनही न खचता प्रयत्नांची शिकस्त; आज करोडोच्या कंपनीचे मालक
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
RIT INVITs allowed to invest in unlisted companies
रिट्स, इन्व्हिट्सना असूचिबद्ध कंपन्यांत गुंतवणुकीस मुभा
Pedestrian Day Pune , Lakshmi Road Pune ,
एका दिवसात पुणे महापालिकेने केली लाखोंची उधळण..! नक्की कशासाठी खर्च केले पैसे
Investment opportunity in a large industrial group that is the backbone of the industrial world
उद्योगविश्वाचा कणा असलेल्या बड्या उद्योगसमूहात गुंतवणुकीची संधी; आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंडाचा ‘काँग्लोमरेट फंड’ दाखल
sugar prices fall to a record low of rs 3300 per quintal in maharashtra
ऐन हंगामात साखरेचे दर गडगडले; जाणून घ्या, प्रति क्विंटल दर, कारखान्यांची स्थिती
maharashtra state cooperative bank claim government to pay rs 2200 crore of sugar mills
कर्ज कारखान्यांचे, बोजा सरकारवर; साखर कारखानदारांचे २२०० कोटी फेडण्यासाठी राज्य बँकेचा सरकारवर दावा
Courses like engineering management and computer applications help employees enhance skills and education
नोकरदारांसाठी सुरू केलेल्या अभ्यासक्रमांना किती झाले प्रवेश? धक्कादायक आकडेवारी आली समोर…

काय आहेत ऑफर्स?

होंडा सिटीची ५ वी जनरेशन ५३,५०० रुपयांपर्यंत मिळू शकेल.

होंडा सिटीची ४ थी जनरेशन २२,००० रुपयांपर्यंत मिळू शकेल.

न्यु होंडा अमेझ ही कार १८,००० रुपयांपर्यंत मिळू शकेल.

न्यु होंडा WR-V ही कार ४०,१०० रुपयांपर्यंत मिळू शकेल.


न्यु होंडा जाझ ही कार ४५,९०० रुपयांपर्यंत मिळू शकेल.

ग्राहकांसाठीच्या या विशेष ऑफर्स रोख रकमेत सवलत, ऍक्सेसरीज, लॉयल्टी बोनस आणि विशेष एक्सचेंज लाभ या स्वरूपात असतील. कंपनी ग्राहकांना सहाय्य करण्यासाठी १७ बँका आणि फायनान्शियल इंस्टीट्युशन सोबत एकत्रित आली आहे. ज्यामध्ये ५० हून अधिक आकर्षक आणि परवडणाऱ्या फायनान्स योजना देतात ज्यामध्ये कमी व्याजदरासह ऑन-रोड फायनान्स, कमी इएमआय पॅकेज, विशेष मोराटोरियम योजना आणि दिर्घ अवधिचे कर्ज यांचा समावेश आहे. ऑफर्सच्या अधिक माहितीसाठी ग्राहक अधिकृत वेबसाईटला भेट देऊ शकतात.

Story img Loader