बर्याचदा आपल्याला बाइक एका शहरातून दुसऱ्या शहरात न्यायची असते; पण अनेकदा अंतर फार असल्याने ती रस्त्याने चालवत नेणे शक्य होत नाही. अशा वेळी आपण खासगी पार्सल कंपनीची मदत घेतो; पण त्यासाठी हजारो रुपये खर्च करावा लागतो. मात्र, भारतीय रेल्वेच्या माध्यमातून तुम्ही हेच काम अगदी कमी पैशात सहज करू शकता. त्यासाठी रेल्वे तुम्हाला एक सुविधाही देते; ज्यामध्ये तुम्ही तुमची बाइक सामान किंवा पार्सलच्या स्वरूपात एका शहरातून दुसऱ्या शहरात ट्रान्स्पोर्ट करू शकता. यामध्ये सामानाचा अर्थ असा आहे की, तुम्ही ज्या ट्रेनमधून प्रवास करीत आहात, त्याच ट्रेनमधून बाइकही नेली जात आहे आणि पार्सल म्हणजे तुम्ही फक्त सामान इच्छित स्थळी पाठवीत (ट्रान्स्पोर्ट) आहात; पण तुम्ही त्या ट्रेनमधून प्रवास करीत नाहीत. ट्रेनमधून बाइक पार्सल करण्यासाठी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धत काय आहे आणि त्यासाठी तुम्हाला किती खर्च करावा लागेल ते जाणून घेऊ.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा