Bitter gourd Health Benefits : कारले हा शब्द जरी उच्चारला तरी तोंडी ‘कडू’ हा शब्द येतो. कारण कारल्याचा स्वाद कडू असतो. कारले कडू असले तरी त्यात अनेक पोषक घटक असतात. यामध्ये लोह, मॅग्नेशियम, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमची मात्रा अधिक असते.
कारले खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. जर तुम्हाला कडू कारले खायला आवडत नसेल तर तुम्ही मध आणि गुळ मिक्स करून कारल्याचा ज्यूस पिऊ शकता. आज आपण कारल्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवणे
शरीरातील रक्ताची पातळी नियंत्रित ठेवण्यासाठी तीन दिवसांपर्यंत रिकाम्यापोटी कारल्याचा ज्यूस प्यावा. यातील अँटी हायपर ग्लायसेमिक तत्वांमुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होते.
भूक वाढणे
जर तुम्हाला भूक लागत नसेल तर तुम्ही कारल्याचा ज्यूस पिऊ शकता. भूक न लागल्यामुळे शरीराला आवश्यक पोषक तत्त्वे मिळत नाही, ज्यामुळे आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात. कारल्याचा ज्यूस दररोज प्यायल्यामुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि भूक वाढते.
हेही वाचा : भारतातील दहा सर्वात सामान्य नावं; तुमचे नाव यात आहे का?
कॅन्सरचा उपचार
कारल्याच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे कॅन्सरसारख्या आजाराचा धोका कमी होतो. कारल्याचा ज्यूस प्यायल्यामुळे कॅन्सर निर्माण करणाऱ्या पेशी शरीरातून नष्ट होतात.
डोळ्यांचे आरोग्य
डोळ्यांच्या आरोग्यासाठी कारल्याचा ज्यूस फायदेशीर आहे. नियमित कारल्याच्या ज्यूसचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी सुधारते. कारल्यात बिटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ए ची मात्रा अधिक असते, जी डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. याशिवाय कारल्यात असणारे व्हिटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमुळे डोळ्यांवर होणारा दुष्परिणाम दूर करतात.
(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)