आजच्या काळात सुंदर सुंदर कपडे आपल्याला परिधान करायाला मिळतात. विविध प्रकारच्या फॅशनचे कपडे बाजारात उपलब्ध आहे. त्यामुळे लोक नवनवीन फॅशनचे कपडे परिधान करून प्रयोग करतात. मुलींना तर कितीही कपडे असले तरी कमीच पडतात. पण मुलगा असो वा मुलगी, पटकन कुठेही जायचं असेल किंवा सर्वात आरामदायी कपडे म्हटलं की सध्या प्रत्येकजण जीन्स वापर खूप जास्त करतात. छोट्या मुलांपासून ते मोठ्या लोकांपर्यंत जवळपास प्रत्येकजण जीन्स वापरतो. अगदी भाजीवाल्यापासून ते सेलिब्रिटीपर्यंत आजकाल सर्वजन जीन्सचा वापर सर्सास करतात.

जीन्स ही आपल्या रोजच्या वापरातील गोष्ट झाली आहे. त्याचे कारण असे की एखादी जीन्स बरेच दिवस टिकते आणि अत्यंत आरामदायी असतात.. आज काल लवचिक(फ्लेक्झिबल) जीन्स बाजारात आल्या आहेत त्यामुळे हालचाल करणे सोपे होते. जीन्समध्येही आता विविध रंगाचे पर्याय उपलब्ध असतात पण यामध्ये काळ्या रंगाची जीन्सला सर्वांची पसंती जास्त असते कारण त्यावर कोणताही रंगाचे टॉप, टीशर्ट परिधान करता येतात आणि ती दिसायला देखील चांगली दिसते. बऱ्याचदा खूप वेळा जीन्स वापरल्यामुळे तीचा काळा रंग फिका पडतो आणि जीन्स पांढरी पडू लागते. पण तुम्हाला माहितीये का, तुम्ही फिक्या पडलेल्या जीन्सला घरीच रंग देऊ शकता? होय ते अगदी कमी खर्चात. तुम्हाला जर नवीन जीन्स घ्यायची नसेल तर तुम्ही तुमच्या जुन्या जीन्सलाच रंग देऊ नव्यासारखी बनवू शकता. हे कसे करायचे यासाठी छोटी ट्रिक आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

What Happened Used Onion And Chutney In Hyderabad Amritsar Haveli Restaurant Shocking Food Video
हॉटेलमध्ये उष्ट्या कांदा आणि लोणच्याचं काय होतं माहितीये? VIDEO पाहून तुमच्याही पायाखालची जमिन सरकेल
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
kitchen tips hacks how to clean kitchen utensils shiny
Kitchen Hacks : चपातीमुळे काळा पडलेला, खराब झालेला तवा काही मिनिटांत होईल चकाचक; वापरा फक्त ‘या’ सोप्या ट्रिक्स
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
tripti dimri aashiquie 3 exit anurag basu
बोल्ड भूमिकांमुळे तृप्ती डिमरीचा Aashiqui 3 मधून पत्ता कट? दिग्दर्शक प्रतिक्रिया देत म्हणाला, “तिलाही हे…”
car is going viral on social media because of the quotes written on its front funny Photo goes viral
PHOTO: दोस्तांचा नादच नाय! मित्र पोलीस म्हणून कारवर लिहलं असं काही की पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल
Car Cabin Bad Smell
तुमच्याही गाडीमध्येही सतत घाणेरडा दुर्गंध येतो? मग एका स्वस्तातल्या सोप्या उपायाने गाडी आतून होईल फ्रेश

हेही वाचा – ऑल आउटची रिफील संपली तर फेकून देताय? त्यापेक्षा ‘असा’ करू शकता पुन्हा वापर

फिक्या पडलेल्या जीन्सला रंग कसा द्यावा?

  • सर्वात आधी एका मोठ्या पातेल्यात पाणी घ्या आणि गॅसवर गरम करायाला ठेवा
  • नंतर त्यात २ चमचे मीठ टाका.
  • त्यानंतर एका वाटीत केमिकल डायचे पावडर घ्या जे साधारण ५० रुपयात मिळते.
  • त्यात पाणी टाकून, एकत्र करून घ्या.
  • त्यानंतर हे मिश्रण गरम केलेल्या पाण्यात टाका.
  • उकळी आल्यानंतर त्यात हळूवारपणे तुमची जीन्स त्यात टाका.
  • गॅस बंद करून साधारण २० मिनिटे जीन्स भिजवत ठेवा.
  • नंतर त्या पाण्यातून काढा आणि साध्या पाण्यात टाकून पिळून घ्या म्हणजे जास्तीचा रंग निघून जाईल.
  • त्यानंतर जीन्स वाळवून घ्या.
  • तुमची नवीन जीन्स तयार आहे.

हेही वाचा – Cleaning Hacks: झटपट गायब होईल चहा-कॉफीचे हट्टी डाग! हे सोपे उपाय वापरून पाहा

इंस्टाग्रामवर allen_choudhary नावाच्या अकांउटवर हा ट्रिक सांगितली आहे. या ट्रिकचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही ट्रिक काम करते का हे तुम्ही स्वत: वापरून पाहू शकता.

Story img Loader