आपण भारतीय मसाल्यातील सर्वात लोकप्रिय मसाल्यांबद्दल बोललो तर काळी मिरी त्यापैकी एक आहे. काळी मिरी ही नैसर्गिक रूपाने ऍंटिबायोटिकच कार्य करत असते. जर आपण काळी मिरीचा वापर आपल्या रोजच्या आहारात केला तर जेवणाची चव वाढतेच त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत करते. करोनापासून बचाव करण्यासाठी कित्येक लोक काळी मिरीचा कोणत्या न कोणत्या खाद्य पदार्थामधून वापर करताना दिसतात. काळी मिरी औषधी गुणांनी संपन्न आहे. मिरी मध्ये व्हिट्यामिन सी, ए, फ्लॉव्होनाईड्स कॅरोटीन आणि अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. रोजच्या आहारात जर अर्धा चमचा मिरीपावडर वापरल्याने मिरीचे अनेक फायदे आपल्याला सहजरीत्या मिळू शकतात. काळी मिरीमधील मुख्य घटक पॅपरीन, पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी खूपच उपयुक्त ठरते. चला तर मग जाणून घेऊयात काळ्या मिरीचा वापर
1) काळ्या मिरीचा सूपमध्ये करा असा वापर
आपण विशेषतः टोमॅटोचा सूप मध्ये काळ्या मिरीचा वापर करू शकतात. कारण टोमॅटोमध्ये अँटीऑक्सिडेंट, व्हिटॅमिन सी, बीटा-कॅरोटीन असे गुणधर्म असतात. यामुळे आपल्या शरीरातील ऑक्सिडेटिव्ह ताण कमी करते. या तणावामुळे देखील शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत होऊ शकते. अशा परिस्थितीत टोमॅटोच्या सूपमध्ये मिरपूड मिसळल्याने शरीराची उष्णता वाढेल आणि तुमची प्रतिकारशक्ती बळकट होईल.
2) काळ्या मिरचीचा चहा:-
जर आपण रोज सकाळच्या चहा मध्ये काळ्या मिरीचा वापर केला तर शरीरातील मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी काळी मिरी खूप उपयुक्त ठरते. तसेच आपले वजन कमी करण्यास देखील याचा फायदा होतो.
3)काळ्या मिरीचा काढा :
करोनाच्या काळात रोगप्रतिकार शक्ति वाढवण्यासाठी आपण सगळ्यांनी काळ्या मिरीचा काढा करून घेतला असेल. अशातच पावसाळच्या दिवसात वाढणारे आजार व रोगराई यांच्या पासून सरंक्षण मिळण्यासाठी काळ्या मिरीचा काढा फायदेशीर ठरतो.
४) कोशिंबीर व जेवणात करा काळ्या मिरीचा वापर
रोजच्या जेवणात जर आपण कोशिंबीर करत असाल तर त्यात देखील तुम्ही काळी मिरीची पूड तयार करून वापर करू शकता. काळी मिरीचा वापर कोशिंबिरीमध्ये केल्याने त्याची चव वाढतेच आणि आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. या व्यतिरिक्त तुम्ही रोज सकाळी अंडी उकडून खात असाल तर अंड्यांवर देखील मिरी पूड टाकून खाऊ शकता.
सगळीकडे करोनाचे संकट आहे आणि पावसाळा ऋतु सुरू झालेला आहे. यामुळे अनेक आजारांशी आपल्याला सामना करावा लागतोय. त्यात इतर आजारांशी लढण्याकरिता रोगप्रतिकारशक्ति मजबूत करण्यासाठी काळया मिरीला महत्वाचे स्थान देण्यात आलंय. त्यामुळे आवर्जून काळया मिरीचा वापर करा.