Black Salt Water Benefits हे तर सगळ्यांनाच माहीत आहे की, पांढऱ्या मिठाऐवजी काळ्या मिठाचे आरोग्याला अनेक फायदे होतात. काळ्या मिठाचा वापर लोणचं बनवण्यासाठी, सलादमध्ये, काही ड्रिंक्समध्ये, लिंबू पाण्यात आणि फ्रूट सलादमध्ये केला जातो. ज्यामुळे टेस्ट वाढते. काळ्या मिठामध्ये पोटॅशिअम, मॅग्नेशिअम आणि कॅल्शिअमसारखे पोषक तत्व असतात. जे आरोग्यासाठी गरजेचे आहेत. जर तुम्ही रोज काळ्या मिठाचं पाणी प्याल तर शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतं. याचा आहारात समावेश केल्याने पोट आणि शरीर दोन्ही थंड राहतात. एवढेच नाही तर अनेक आजारांपासून दूर राहण्यास मदत होते. चला जाणून घेऊ याचे फायदे…

काळ्या मिठाचं पाणी

Tomato soup in winter is good for health Tomato soup recipe in marathi
हॉटेलसारखं परफेक्ट टोमॅटो सूप १० मिनीटांत होईल तयार; थंडीत गरमागरम सूप करा एन्जॉय, सोपी रेसिपी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
Consuming too many fruits every day can cause various health issues said doctors
तुम्हाला रोज जास्त फळे खाण्याची सवय आहे? मग शरीरावर होऊ शकतो ‘हा’ परिणाम, वाचा तज्ज्ञ काय सांगतात…
curd and coffee for tan removal
Tan Removal Remedy : चमकदार त्वचेसाठी घरच्या घरी करा उपाय! दही व कॉफीचा लावा मास्क; पण डॉक्टरांचे मत काय?
Winter special recipe in marathi Eat sweet and sour tomato chutney with jaggery to stay healthy during winters
हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी खा गुळ-टोमॅटोची चटणी; रेसिपी आहे एकदम सोपी
Black Plastic Kitchenware May Look Nice But Could Be Harming Your Health: Latest Study Finds
महिलांनो तुम्हीही स्वयंपाकघरात काळी भांडी वापरता? परिणाम वाचून पायाखालची जमीन सरकेल
how to remove bad smell from bathroom
बाथरूम आणि टॉयलेटमधील दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा ‘ही’ घरगुती ट्रिक
Benefits of eating tup chapati
पोळीला तूप, साखर लावून खाल्ल्याने होतात अनेक फायदे; पण खाण्याची योग्य वेळ कोणती?

कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. याशिवाय यकृताचेही डिटॉक्सिफिकेशन होते. या खास पेयाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे हे पाणी प्यायल्याने यकृताच्या पेशींमध्ये साचलेली घाण लगेच निघून जाते. त्याचवेळी, ते यकृताच्या कार्यास गती देते. तसेच अनेक आजारांपासून बचाव होतो.

संपूर्ण शरीर डिटॉक्स करते

कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून प्यायल्याने शरीरातील सर्व घाण निघून जातात. हे शरीरात किंवा शिरांमध्ये अडकलेली सर्व घाण बाहेर काढते.

केस मजबूत करण्यासाठी फायदेशीर

जर तुमचे केस कोरडे आणि निर्जीव झाले असतील, तर ते मजबूत करण्यासाठी काळे मीठ वापरू शकता. दुतोंडी केसांची समस्या असल्यास हेअर पॅकमध्ये काळे मीठ मिसळा. काळ्या मिठामुळे केसांना आवश्यक ते सर्व पोषक घटक मिळतात. यामुळे केस मजबूत आणि चमकदार होतात.

त्वचा निरोगी बनवते

काळ्या मीठामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यात मदत करतात. यासाठी कोमट पाण्यात काळे मीठ मिसळून त्वचेवर लावा. यामुळे त्वचा लवकर बरी होण्यास मदत होईल. यासोबतच ते त्वचेसाठी नैसर्गिक क्लिन्झरप्रमाणे काम करते. हे मिश्रण त्वचेवरील अस्वच्छता काढून टाकून, त्वचा आतून निरोगी बनवण्यास मदत करते.

बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून सुटका

काळे मीठ पाण्यात मिसळून प्यायल्याने बद्धकोष्ठतेसारख्या गंभीर समस्यांपासून कायमचा आराम मिळतो. पोट निरोगी ठेवण्यासोबतच ते चयापचय देखील मजबूत करते. यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो आणि मुळव्याधच्या समस्येपासून कायमची सुटका होते.

पचनक्रिया चांगली होते

जर रोज सकाळी काळ्या मिठाचं पाणी प्याल तर तुमची पचनक्रिया अधिक चांगली होईल, कारण याने पोटात हयड्रोक्लोरिक अॅसिड आणि प्रोटीन पचवणारे इंजाइम अॅक्टिव होतात. तसेच गॅस आणि अॅसिडिटीसारख्या समस्याही होत नाहीत.

हेही वाचा >> तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे असतात ‘हे’ ८ लहानसे बदल; दात घासताना ‘असा’ करा तपास; ‘या’ अवयवांना सुद्धा होतात वेदना

वजन होईल कमी

भारतात वजन वाढण्याची समस्या फारच वाढली आहे. एकदा का वजन वाढलं तर अनेक आजार होतात. काळ्या मिठाच्या पाण्यात अॅंटी-ओबेसिटी तत्व अशतात ज्यामुळे वाढणारं वजन कमी होण्यास मदत मिळते.

Story img Loader