ल्युकेमिया हा एक प्रकारचा कर्करोग आहे जो पांढऱ्या रक्त पेशींवर परिणाम करतो. दरवर्षी ६० हजारांहून अधिक लोकांना ल्युकेमिया होतो. वयानुसार ल्युकेमिया होण्याचा धोका वाढतो, परंतु २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्येही हा आजार विकसित होऊ शकतो. वास्तविक, ल्युकेमिया हा रक्त आणि अस्थिमज्जाचा (बोन मॅरो) कर्करोग आहे. कर्करोग कुठेही होऊ शकतो, परंतु जेव्हा बोन मॅरोमध्ये ल्युकेमिया पेशींची असामान्य आणि जलद वाढ होते तेव्हा ल्युकेमिया विकसित होतो. जे लवकरच बोन मॅरोतील इतर सामान्य रक्तपेशींपेक्षा जास्त होते.
परिणामी, ल्युकेमिया पेशी रक्तप्रवाहात सामान्य रक्त पेशी सोडण्यात व्यत्यय आणतात. यामुळे विविध अवयव आणि ऊतींना ऑक्सिजनचा पुरवठा कमी होतो. या सर्व परिस्थितीमुळे शरीरात संसर्ग आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याची शक्यता असते. ल्युकेमियामध्ये थकवा, वजन कमी होणे, वारंवार संसर्ग होणे, अशक्तपणा, ताप किंवा थंडी वाजणे, हाडे दुखणे आणि रक्तस्त्राव यांचा समावेश असू शकतो.
विशेष म्हणजे तुम्हाला ल्युकेमिया कसा झाला हे तुम्हाला कधीच कळू शकत नाही, कारण याचे कोणतेही अचूक कारण नाही. तरीसुद्धा, शास्त्रज्ञांनी त्याचे काही जोखीम घटक शोधून काढले आहेत. जागतिक रक्त कर्करोग दिनानिमित्त आपण अशा आठ प्रकारच्या लोकांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांना ल्युकेमियाचा सर्वाधिक धोका असतो.
- तसे, ल्युकेमिया किंवा रक्त कर्करोग कोणालाही होऊ शकतो. परंतु महिलांपेक्षा पुरुषांमध्ये याचे प्रमाण जास्त आहे.
- तुम्ही केमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी घेत असलेली व्यक्ती असल्यास, तर अशा परिस्थितीत तुम्हाला विशिष्ट प्रकारच्या ल्युकेमियाचा धोका वाढतो.
- पॉवर लाइन किंवा टॉवरच्या दीर्घकाळापर्यंत संपर्कात राहिल्याने एखाद्या व्यक्तीला एक्यूट लिम्फोब्लास्टिक ल्युकेमिया (एएलएल) होण्याचा धोका वाढू शकतो.
- धूम्रपानामुळे थेट ल्युकेमिया होत नाही, परंतु नियमितपणे सिगारेट ओढणाऱ्या व्यक्तीला एक्यूट मायलोइड ल्युकेमिया (एएमएल) होण्याचा धोका अधिक असतो.
- बहुतेक ल्युकेमियाचा धोका वयानुसार वाढतो. एक्यूट मायलोइड ल्युकेमिया, क्रॉनिक लिम्फोसाइटिक ल्युकेमिया असलेले रुग्ण ६५ वर्षे आणि त्याहून अधिक वयाचे आहेत. तथापि, एक्यूट मायलोइड ल्युकेमियाची बहुतेक प्रकरणे २० वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांमध्येही दिसून येतात.
‘या’ डाळींचे सेवन Diabetes च्या रुग्णांसाठी ठरेल फायदेशीर; आजच करा आहारात समावेश
- जर एखादी व्यक्ती गॅसोलीनमध्ये आढळणाऱ्या बेंझिनसारख्या रसायनाच्या संपर्कात आली तर त्याला रक्ताचा कर्करोग होऊ शकतो.
- ल्युकेमियाच्या विकासामध्ये अनुवांशिक विकृती भूमिका बजावतात. काही अनुवांशिक विकार, जसे की डाऊन सिंड्रोम, ल्युकेमियाच्या वाढत्या जोखमीशी संबंधित आहेत.
- बहुतेक ल्युकेमियाचा कोणताही कौटुंबिक संबंध नसतो. तथापि, जर तुम्ही क्रॉनिक लिम्फोसाइटिक ल्युकेमिया (सीएलएल) रुग्णाचे प्रथम नातेवाईक असाल किंवा एकसारखे जुळे असल्यास, त्या व्यक्तीला ल्युकेमिया होण्याचा धोका वाढतो.
ल्युकेमिया हा कर्करोगाचा एक प्रकार आहे जो बोन मॅरोमध्ये रक्त तयार करणाऱ्या पेशींवर परिणाम करतो. याला प्रतिबंध करण्याचा कोणताही निश्चित मार्ग नाही, तरीही जीवनशैलीत काही बदल करणे आणि निरोगी सवयींचे पालन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते. हा भयंकर आजार टाळण्यासाठी तज्ज्ञ लोकांना धूम्रपान करू नका, शरीराचे वजन निरोगी ठेवा आणि शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहा असा सल्ला देतात.
(येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता कृपया तज्ञांचा सल्ला घ्या.)