ब्लड प्रेशर ही आजकाल एक सामान्य समस्या झाली आहे. पण, ब्लड प्रेशरची लेव्हल नियंत्रित करण्यात आहार महत्त्वाची भूमिका बजावते. यासाठी निरोगी आहार जसे की, फळे, भाज्या, कडधान्ये, प्रथिनेयुक्त आहार आणि योग्य प्रमाणात चरबीयुक्त गोष्टींचा समावेश असावा. याशिवाय काही हेल्दी ड्रिंक्स पिऊन ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत होऊ शकते. याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना नानावटी मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आहारतज्ज्ञ डॉ. उषाकिरण सिसोदिया यांनी ही माहिती दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डॉ. सिसोदिया यांच्या माहितीनुसार, आहाराचा आपल्या ब्लड प्रेशरवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो. यात सोडियमचे प्रमाण (मीठ) जास्त असलेले अन्न हाय ब्लड प्रेशरसाठी कारणीभूत ठरते; तर पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबरयुक्त पदार्थ लो ब्लड प्रेशरचे कारण ठरते. रक्तवाहिन्यांवर अन्नाच्या होणाऱ्या परिणामांवर ब्लड प्रेशरची पातळी अवलंबून असते.

आहारतज्ज्ञ लवनीत बत्रा यांनी इन्स्टाग्रामवर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास मदत करणारे तीन ड्रिंक्स शेअर केले आहेत.

ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवणारे ‘हे’ तीन ड्रिंक्स

आहारात आणि जीवनशैलीत बदल करण्याव्यतिरिक्त संशोधनात असे दिसून आले की, अनेक ड्रिंक्सचे प्रकार तुमच्या शरीरातील ब्लड प्रेशरची लेव्हल नियंत्रणात ठेवण्यास आणि ह्रदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करू शकतात, असे बत्रा यांनी सांगितले.

१) आवळा आणि आल्याचा रस

आवळ्याचा रस ताण कमी करण्यास आणि ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो, तर आल्याचा रस रक्तवाहिन्यांंतून रक्त प्रवाह सुरळीत करण्यास प्रोत्साहन देतो. यामुळे आवळा आणि आल्याचा रस ब्लड प्रेशरसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

आवळा अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीने समृद्ध आहे, जो रक्तवाहिन्यांचा विस्तार करण्यास आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतो. आलं रक्ताभिसरण सुधारण्यासाठी ओळखले जाते. त्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रित करण्यात मदत होते, यावर डॉ. सिसोदिया यांनी सहमती दर्शवली.

२) धण्याच्या बियांचे पाणी

धण्याच्या बियांच्या पाण्यामुळे लघवीचे प्रमाण वाढते. यामुळे ते तुमच्या शरीरातील अतिरिक्त सोडियम आणि पाणी बाहेर काढण्यास मदत करते. त्यामुळे तुमचे ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहते. धण्याचे पाणी ब्लड प्रेशरसाठी चांगले असते. धण्याच्या बियांमध्ये लघवीचे प्रमाण वाढवणारे गुणधर्म आहेत, जे सोडियम काढून टाकण्यास आणि ब्लड प्रेशर कमी करण्यास मदत करतात, असे डॉ. सिसोदिया यांनी स्पष्ट केले.

३) बीट आणि टोमॅटोचा रस

बीट हा नायट्रेटने (NO3) समृद्ध आहे, ज्यात ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवण्याचे सक्षम घटक असतात. यामुळे शरीरात नायट्रिक ऑक्साईड (NO) तयार होते आणि रक्तप्रवाह सुधारतो. तसेच एंडोथेलियल फंक्शनला अनुकूल करते.

टोमॅटोच्या अर्कामध्ये लाइकोपीन, बीटा कॅरोटीन आणि व्हिटॅमिन ई सारख्या कॅरोटीनोइड्स असतात, जे फ्री रॅडिकल्स निष्क्रिय करण्यासाठी आणि सिस्टोलिक आणि डायस्टोलिक ब्लड प्रेशर दोन्ही सुधारण्यासाठी प्रभावी अँटिऑक्सिडंट म्हणून ओळखले जातात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood pressure control tips try these 3 drinks to manage your blood pressure levels sjr