जगभरात लाखो लोकं मधुमेहाने त्रस्त आहेत. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, मधुमेह हा असाध्य आजार आहे, परंतु रुग्ण आपल्या आहार आणि जीवनशैलीत बदल करून वाढत्या रक्तातील साखरेवर नियंत्रण ठेवू शकतो. मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांच्या मनात अन्नाशी संबंधित अनेक प्रश्न असतात की त्यांच्यासाठी कोणता पदार्थ फायदेशीर ठरू शकतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वास्तविक मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांना रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागते. सामान्यतः 0असे मानले जाते की मधुमेहींनी फळे खाऊ नयेत कारण त्यात फ्रक्टोज ही नैसर्गिक साखर असते. असाच विश्वास सामान्यतः केळ्यांबाबत असतो, पण तुम्हाला माहिती आहे का की केळीचे सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते? चला सविस्तर जाणून घेऊयात…

मधुमेह असलेल्या रुग्णांनी केळीचे सेवन करावे का?

आरोग्य तज्ज्ञांच्या मते केळीमध्ये साखर आणि कार्ब्स आढळतात. याशिवाय, केळीमध्ये भरपूर फायबर देखील आढळते आणि त्याच वेळी त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की मधुमेहाचे रुग्ण केळीचे सेवन करू शकतात परंतु ते जास्त प्रमाणात सेवन करू नये. त्यांनी आठवड्यातून दोन किंवा तीनपेक्षा जास्त केळी खाऊ नयेत. उच्च रक्तातील साखर असलेल्या रुग्णांनी पिकलेली केळी खाण्यापूर्वी त्यांच्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

कच्ची केळी मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे

मधुमेहाचे जाणकार सल्लागार डॉक्टर सुनीत सिंग यांनी सांगितले की, कच्च्या केळीला जीवनसत्त्वांचे पॉवर हाऊस म्हटले जाते. पोटॅशियम व्यतिरिक्त, कच्च्या केळ्यामध्ये अनेक जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. त्यातील काही पौष्टिक घटक व्हिटॅमिन सी, बी६ आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, कच्च्या केळ्याचे सेवन केल्याने लोह आणि फोलेटसारखे जीवनसत्त्वे देखील आवश्यक घटक मिळतात, तसेच हे सर्व जीवनसत्त्वे शोषून घेण्यातही केळी फायदेशीर आहे.

डॉ सुनीत यांनी सांगितले की जर तुम्हाला मधुमेह असेल तर कच्ची केळी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते, कारण त्यात साखरेची पातळी देखील कमी आहे आणि त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील ३० आहे. ५० पेक्षा कमी GI असलेले पदार्थ सहज पचतात, सहज शोषले जातात आणि तुमच्या रक्तातील साखरेची पातळी देखील यामुळे नियंत्रित होते.

एका संशोधनानुसार, एका मध्यम कच्च्या केळीमध्ये दैनंदिन गरजेच्या १३० कॅलरीज, व्हिटॅमिन बी६ (४२.३१%), कार्बोहायड्रेट (२६.३५%), मॅंगनीज (१७.६१%), व्हिटॅमिन सी (१४.५६%) आणि लोह (१३.००%) असतात.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood sugar banana can be beneficial for diabetic patients but keep this one thing in mind before eating scsm