वाढदिवसाच्या वेळी मेणबत्तीला फुंकर घालून विझवण्याची आपली परंपरा नाही. आपण उलट दिव्याने त्या व्यक्तीला ओवाळतो, मेणबत्ती विझवण्याच्या या कृतीमुळे वाढदिवसाच्या केकवरील जंतूंची संख्या १४०० टक्क्यांनी वाढते, असे संशोधनात दिसून आले आहे. अमेरिकेतील क्लेमसन विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार वाढदिवसाच्या दिवशी केक सजवून ठेवलेला असतो व मेणबत्ती लावलेली असते व ती फुंकर मारून विझवली जाते. पण त्यामुळे केकवरील जंतू वाढून आरोग्याला धोका निर्माण होतो. जर्नल ऑफ फूड रीसर्च या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून प्राचीन ग्रीसमध्ये शिकारीची देवता असलेल्या आर्टेमिसच्या मंदिरात मेणबत्ती पेटवून बरोबर केक आणण्याची पद्धत होती. इतर संस्कृतीतील आख्यायिकेप्रमाणे मेणबत्तीचा धूर हा सदिच्छा व प्रार्थना देवापर्यंत पोहोचवतो. अनेक देशात ही परंपरा आहे, पण जेव्हा आपण मेणबत्तीवर फुंकर मारतो तेव्हा मानवी श्वासातील बायोएरोसोलमधील जिवाणू केकच्या पृष्ठभागावर बसतात. एरोसोल केकवर गेल्याने हा धोका निर्माण होतो. संशोधकांनी मेणबत्तीवर फुंकर मारल्यानंतरचे केकचे नमुने घेऊन तपासणी केली असता त्यात जिवाणू मोठय़ा प्रमाणावर आढळून आले. त्यामुळे जिवाणूंचे प्रमाण १४०० टक्के वाढते असे दिसून आले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा