लोकप्रिय फोटो-मेसेजिंग अॅप इन्स्टाग्रामने अनेक दिवसांच्या पडताळणीनंतर आपल्या सर्व युजर्सना अकाउंट व्हेरिफायचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. आता कोणताही इन्स्टाग्राम युजर आपल्या अकाउंटला ‘ब्ल्यू टिक’सह व्हेरिफाय करु शकतो. विशेष म्हणजे तुम्ही इन्स्टाग्राम अॅपवरुनच अकाउंट व्हेरिफिकेशनसाठी अर्ज करु शकतात. तर जाणून घेऊया इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफाय कसं करायचं –

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

इन्स्टाग्राम अकाउंट व्हेरिफिकेशनचा पर्याय सध्या केवळ आयओएस युजर्ससाठी सुरू करण्यात आला आहे. जर तुम्ही अॅन्ड्रॉइड युजर असाल तर तुम्हाला यासाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागेल. जर तुम्ही आयफोन वापरत असाल तर तुमच्या इन्स्टाग्राम अकाउंटला व्हेरिफाय करण्यासाठी सर्वप्रथम तुमचं अॅप अपडेट करा. यानंतर अकाउंटच्या सेटिंगमध्ये गेल्यावर तुम्हाला Request Verification चा पर्याय मिळेल. त्यानंतर तुम्हाला इन्स्टाग्राम आयडी, नाव आणि फोटोसह एक ओळखपत्र मागितलं जाईल. त्यानंतर इन्स्टाग्रामकडून तुमच्या अर्जाची पडताळणी केली जाईल आणि तुम्हाला कन्फर्मेशनचा ई-मेल मिळेल.

इन्स्टाग्राम ब्ल्यू टिकची सुरूवात ऑस्ट्रेलियातून झाल्याचं सांगितलं जातं. सर्वात आधी कंपनीने ऑस्ट्रेलियातच याची चाचणी घेतली होती. चाचणीदरम्यान पारदर्शकता आणि फेक अकाउंट्स रोखण्यासाठी हा पर्याय उपलब्ध करुन दिल्याचं इन्स्टाग्रामने सांगितलं होतं.