Body Odor and Diabetes: ज्या लोकांना उच्च रक्तातील साखरेची समस्या आहे त्यांनी त्यांच्या आहाराकडे आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. आरोग्याबाबत थोडासा निष्काळजीपणाही त्यांच्यासाठी घातक ठरू शकतो. यासाठी त्यांना योग्य औषधोपचार, आहार आणि व्यायामाची गरज आहे. शरीरातुन येणाऱ्या वासावरूनही तुम्ही उच्च रक्तातील साखरेची समस्या ओळखू शकता. विशेषत: तुमच्या तोंडातून येणारा वास उच्च साखरचे संकेत देतो.
मधुमेहामध्ये शरीराला कसा वास येतो?
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, मधुमेह केटोआसिडोसिस (Diabetic ketoacidosis) हा मधुमेहाच्या दुष्परिणामांपैकी एक आहे. ही समस्या तेव्हा सुरू होते जेव्हा शरीराच्या पेशींना पुरेशी ऊर्जा पुरवण्यासाठी इन्सुलिन नसते आणि यामुळे रक्तातील साखर पेशींपर्यंत पोहोचत नाही. त्यामुळे लिव्हर ऊर्जेसाठी चरबी तोडते, यामुळे शरीरात केटोन्स नावाचे ऍसिड तयार होते. असे होते. परंतु जेव्हा केटोन्स जास्त प्रमाणात तयार होते तेव्हा रक्त आणि लघवीमध्ये धोकादायक पातळीवर जमा होऊ लागते. तेव्हा रक्त आम्लयुक्त होते. शरीराच्या गंधाचे तीन प्रकार आहेत. हा वास प्रामुख्याने तोंडातून आणि घामातून येतो.
( हे ही वाचा: Uric Acid: जास्त पाणी प्यायल्याने युरिक अॅसिड कमी होऊ शकते का? गाउट अटॅक कमी करण्यासाठी ‘हे’ उपाय जाणून घ्या)
अशा वासावरून ओळखा मधुमेह आहे की नाही
क्लीव्हलँड क्लिनिकच्या मते, शरीरात जास्त प्रमाणात केटोन्समुळे श्वासात फळांचा वास येऊ शकतो. अनेकदा श्वासाला सांडपाण्याचा वास येतो. यामुळे दीर्घकाळ उलट्या होऊ शकतात. केटोन्स जास्त असल्यामुळे श्वासाला अनेकदा अमोनियासारखा वास येतो. जे किडनी समस्या असलेल्या लोकांमध्ये सामान्य आहे.
चुकूनही ‘या’ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका
मधुमेहाने ग्रस्त असलेल्या लोकांना त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी वारंवार तपासण्याचा आणि स्थिती बिघडू नये म्हणून आवश्यक पावले उचलण्याचा सल्ला दिला जातो. तसेच, रक्तातील साखरेची पातळी संतुलित स्थितीत ठेवण्यासाठी निरोगी, सक्रिय आणि संतुलित जीवनशैली ठेवा. जर तुमच्या तोंडातून असा वास येत असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊन शरीरातील साखर आणि मधुमेहाची तपासणी करून घ्या.