Ayurveda Tips For Stronger Bones: ऋतूबदलाप्रमाणे शरीरातही अनेक बदल होत असतात, यावेळी आपल्या जीवनशैलीत आवश्यक ते बदल न केल्यास आजारांचा धोका बळावतो. अलीकडे व्यायाम व सकस आहाराच्या अभावामुळे शरीराला आवश्यक ते पोषण मिळत नाही. परिणामी हाडे कमकुवत होऊन सांधे दुखीची समस्या वाढत आहे. हा अनुभव तुम्हालाही आला आहे का सांगा.. तुम्ही ऑफिसच्या खुर्चीत किंवा झोपेतून उठल्यावर आळस देण्यासाठी हात लांब करता आणि हाडांचा कडकडण्याचा आवाज होतो. तुम्ही उठता- बसता सांध्यांमधून आवाज ऐकू येतो? मंडळी हा आवाज तुम्हाला वेळीच सावध होण्याचा इशारा आहे असे समजा. हाडांमधून येणारा आवाज हा आजार नसून आजाराची सुरुवात आहे.
तुमच्या हाडांसाठी आवश्यक ल्युब्रिकेशन मिळत नसल्याने हाडे कडाडण्याचा आवाज येतो. ल्युब्रिकेशन म्हणजे काय तर सांध्यांची हालचाल होताना हाडांचे घर्षण होऊ नये यासाठी चिकट द्रव्य शरीरात तयार होत असते. याला सिनोवियम किंवा कार्टिलेज असेही म्हंटले जाते. जेव्हा या द्रव्याचे प्रमाण कमी होते तेव्हा हाडांचे घर्षण होऊन असा आवाज येतो. आपल्यालाही ही समस्यां जाणवत असल्यास आअहेरात काही विशिष्ट भाज्यांचा समावेश नक्की करून पाहा
कांदा व लसूण
सात्विक आहार घेण्यासाठी अनेकजण कांदा व लसूण खाणे टाळतात, पण आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे कांदा व लसूणात मुबलकर प्रमाणात सल्फर उपलब्ध असते, तसेच एनसीबीआई (नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नोलॉजी इनफार्मेशन) यांच्या माहितीनुसार, कांदा व लसूणात उपलब्ध सल्फरमुळे सांध्यांना सूज येण्याचे तसेच सांधेदुखीचे प्रमाणही कमी होते. कच्च्या कांद्याचे सेवन सांध्यांच्या मजबुतीने काम करते.
लाल भोपळी मिरची
भोपळी मिरची किंवा शिमला मिरचीमध्ये व्हिटॅमिन ए, बी, सी व के मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. व्हिटॅमिन ए मुळे त्वचा, हाडे व दातांचे आरोग्य सुधारण्यात मदत होते. मेडलाइन प्लसच्या माहितीनुसार लाल रंगाच्या भोपळी मिरचीत आढळणारे व्हिटॅमिन के हे हाडांच्या मजबुतीसाठी उपयुक्त असते. तसेच लाल भोपळी मिरचीच्या सेवनाने सांध्यांची लवचिकता वाढते व ल्युब्रिकेशन तयार होण्यातही मदत होते. भोपळी मिरची आपण भाजी किंवा सॅलेड मध्ये टाकून कच्ची किंवा कमी शिजवूनही खाऊ शकता.
Uric Acid: शरीरातील युरिक ऍसिड वाढवतात ‘ही’ ३ फळे; बोटांना सूज, थकव्यासह दिसून येतात ‘ही’ लक्षणे
आलं
ऋतूबदलात उत्तम आरोग्यासाठी आल्याचे सेवन अत्यंत गुणकारी ठरू शकते. आल्यात असणाऱ्या अँटी इंफ्लेमेटरी सत्वांमुळे जॉइंट्स दुखत असल्यास आराम मिळतो. तसेच हाडांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत होते. आल्याचे सेवन आपण रोजच्या जेवणात किंवा चहामध्ये टाकूनही करू शकता. गरम पाण्यात आल्याचे तुकडे उकळून प्यायलावर पोटाचे आरोग्य सुधारण्यातही मदत होते.
बीन्स
घेवडा, राजमा यांसारखे बीन्स प्रोटीन व फायबरचे मोठे स्रोत असतात. या बियांमध्ये फ्लेवोनोइडसह अँटी इंफ्लेमेटरी व अँटी ऑक्सीडेंट उपलब्ध असतात ज्यामुळे शरीराला येणारी सूज व सांधे दुखी कमी होण्यास मदत होते. या बियांमध्ये कॅल्शियम असल्याने हाडांच्या मजबुतीतही मदत होते. तसेच बीन्समधील व्हिटॅमिन ए, के व सिलिकॉन सत्व हाडांसाठी फायदेशीर असतात.
(टीप- वरील लेख हा माहितीपर आहे, आवश्यक असल्यास वैद्यकीय सल्ला घ्यावा)