Boycott Maldives :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिल्यानंतर सर्वत्र लक्षद्वीपची चर्चा आहे. सोशल मीडियावर त्यांचे फोटो व्हायरल होत आहे . दरम्यान, पंतप्रधान मोंदीचे लक्षद्वीप बेटावरील फोटो शेअर करत मालदीवच्या एका मंत्र्यांने त्यांच्यावर टीका केली त्यानंतर लक्षद्वीप विरुद्ध मालदीव असा वाद सुरू झाला. अनेकांनी मालदीवर बहिष्कार टाकणारे पोस्ट केले आणि अनेकांनी मालदीव ट्रिपचे प्लॅन रद्द केले आहे. अनेकांनी लक्षद्वीपला भेट देण्याची योजना आखली आहे. तुम्ही मालदीवऐवजी भारतातील बेटांना भेट देण्याचा विचार करत असाल तर येथे काही उत्तम ठिकाणांची यादी दिली आहे. भारतात अशी अनेक सुंदर ठिकाणे आहेत जे जी तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करतील. खरं तर, भारतात अशी अनेक सुंदर बेट आहेत जी परदेशातील ठिकाणांसारखी दिसतात. म्हणून, जर तुम्हाला आत्ताच उत्सुकता वाटत असेल आणि पूर्वी कधीही न केलेला भारत पाहायचा असेल, तर या भारतीय बेटांना नक्की भेट द्या.

स्वराजद्वीप, अंदमान (Swaraj Dweep, Andaman )

जगातील काही उत्कृष्ट समुद्रकिनाऱ्यांचे ठिकाणांपैकी एक असलेले स्वराजद्वीप बेट हे पूर्वी हॅवलॉक बेट(Havelock Island) म्हणून ओळखले जात असे. हे एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे, जेथे निळ्याशार पाण्याचा समुद्र किनारा पाहून तुम्ही नक्कीच मंत्रमुग्ध व्हाल.

India wins the match as well as the series against South Africa
भारताचा दणदणीत विजय; तिलक वर्मा व संजू सॅमसनची धमाकेदार कामगिरी
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sri Lanka polls Ruling NPP secures two thirds majority
श्रीलंकेच्या संसदेत एनपीपीला बहुमत ; २२५ पैकी १५९ जागांवर विजय
dharavi protestors give preference to toilets
धारावी बचाव आंदोलनकर्त्यांचा वचननामा जाहीर, शौचालयाला प्राधान्य
Amit Shah left public meeting after five minutes due to fear of helicopter couldnt fly after 6 pm
हेलिकॉप्टर उडणार नाही ही भीती; पाच मिनिट अन् गृहमंत्री अमित शहा सभा सोडून…
adventure tourism in india
सफरनामा : साहसी पर्यटन!
Some people in district promoted their own brothers sisters and daughters ajit pawar
नंदुरबार जिल्ह्यात काही जणांकडून भावकीचीच प्रगती, अजित पवार यांचा डॉ. विजयकुमार गावित यांना टोला
shortest tenure chief justice of india (1)
देशाचे सर्वात कमी काळासाठीचे सरन्यायाधीश कोण होते माहितीये? फक्त १७ दिवस राहिले पदावर!

लक्षद्वीप बेट (Lakshadweep Islands)

अरबी समुद्राच्या निळ्या पाण्याच्यामधोमध वसलेले, लक्षद्वीप बेट हे भारतातील सर्वात प्रसिद्ध ठिकाणांपैकी एक आहे. या बेटावर तुम्हाला स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्केलिंगसह अधिक साहसी खेळांचा आनंद घेता येईल. याशिवाय येथील नैसर्गिक सौंदर्य पाहून तुम्ही थक्क व्हाल.

हेही वाचा – पंतप्रधान मोदींनी भेट दिलेल्या लक्षद्वीपला कशी आणि केव्हा द्यावी भेट? किती येईल प्रवासखर्च? सर्व काही जाणून घ्या एका क्लिकवर…

हेही वाचा –लक्षद्वीपची ‘ही’ ७ ठिकाणे आहेत खूप सुंदर

माजुली बेट, आसाम (Majuli Island, Assam)

ब्रह्मपुत्रा नदीवर स्थित असलेले माजुली बेटाला आसाममधील जोरहाट येथून बोटीमधून प्रवास करून भेट देता येईल. या प्रवासाचा चित्तथरारक अनुभव प्रवाशांना येथे भेट देण्यासाठी आकर्षित करतो. हे माहित नसलेल्या ठिकाणांपैकी एक असून येथे तुम्हाला खूप शांतता अनुभवता येईल.

मुनरो बेट, केरळ (Munroe Island, Kerala)

केरळमध्ये आवर्जून भेट देण्याचे ठिकाण, मुनरो बेट कोल्लमपासून सुमारे २७ किमी अंतरावर आहे, जे ओणम सणाच्या वेळी चर्चेत येते. अरुंद जलमार्ग आणि कालव्यावरील समुद्रपर्यटन हे या ठिकाणचे वैशिष्ट्य आहे. हे मनमोहक निसर्गसौंदर्य अनुभवण्यासाठी एकदा नक्की भेट द्या.

रामेश्वरम बेट, तामिळनाडू (Rameshwaram Island, Tamil Nadu)

द्वीपकल्पीय भारत (peninsular India) आणि श्रीलंका यांच्यामध्ये वसलेले, पंबन बेट ((Pamban Island, Tamil Nadu), ज्याला रामेश्वरम बेट असेही म्हणतात. हे तामिळनाडूचे सर्वात मोठे बेट आहे. बंगालच्या उपसागराच्या आश्चर्यकारक निसर्गसौंदर्यामुळे रामेश्वरम बेट पर्यटकांना आकर्षित करते. भारतातील सर्वात लांब सागरी सेतूंपैकी एक असा ‘रामसेतू’ तुम्हाला येथे पाहता येईल. येथील मंदिरे, समुद्रकिनारे अत्यंत सुंदर आहेत. येथे श्री रामनाथस्वामी मंदिराला देखील भेट देऊ शकता.

चोराव बेट, गोवा (Chorao Island, Goa)

चोराव बेट हे निसर्गप्रेमींनी भेट देण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. हे गोव्यातील सर्वात मोठे पक्षी अभयारण्य देखील आहे, जिथे विविध प्रकारच्या समृद्ध वनस्पती आणि प्राणी पाहता येतात. गोव्यातील हे फारसे माहित नसलेल्या ठिकाणी अत्यंत शांता आहे. येथे सुंदर चर्च पाहता येतील. शहरी जीवनातून एक सुटकेचा निश्वास तुम्हाला येथे घेता येईल.

हेही वाचा – Boycott Maldives का होतेय ट्रेंड? पंतप्रधान मोदींच्या लक्षद्वीप भेटीनंतर भारतीयांनी का रद्द केला मालदीव दौरा

दीव बेट, दमण आणि दीव (Diu Island, Daman and Diu)

गुजरातच्या दक्षिणेकडील किनार्‍यावर वसलेले दीव बेट हे त्याच्या निर्जन समुद्रकिनार्‍यांसाठी ओळखले जाते. येथे तुम्हाला पोर्तुगीज संस्कृतीचा प्रभाव दिसून येईल. दीवचे शांत वातावरण, पोर्तुगीज संस्कृतीची झलक पर्यटाकांना मंत्रमुग्ध करतात.

दिवार बेट, गोवा (Divar Island, Goa)

पणजीमपासून सुमारे १० किमी अंतरावर असलेले दिवार बेट हे भारतातील माहित नसलेल्या बेटांपैकी एक आहे. गोव्याचा ग्रामीण भागातील अनुभव देणाऱ्या या बेटाला एकदा नक्की भेट दिली पाहिजे.