नातं म्हटलं की दोन वेगवेगळे स्वभाव आलेच. अनेकदा रिलेशनशीपमध्ये मुलांच्या आवडी निवडीला जास्त प्राधान्य दिलं जातं. अनेकदा गर्लफ्रेंड्स त्यांच्या बॉयफ्रेंड्सच्या आवडी निवडी पटकन ओळखून त्यांच्या आवडीनुसार स्वतःमध्ये बदल करताना दिसून येतात. अनेक नात्यात असं असतं की, सगळ्या गोष्टींची सुरूवात ही मुलानेच करावी. अगदी प्रपोझ देखील मुलानेच करावे असं सांगितलं जातं. अनेकदा मुलं तडजोड करतात मात्र मुलींच्या काही ठराविक सवयींमध्ये मुलं तडजोड करू शकत नाहीत. अशा मुलींच्या नेमक्या कोणत्या सवयी असतात ज्या मुलांना आवडत नाहीत, ते आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

स्वतःची मनमानी: प्रत्येक वेळेस स्वतःची मनमानी करण्याची सवय पुरुषांना अजिबात आवडत नाही. पुरुषाच्या जीवनावर पूर्णतः ताबा मिळवणारी मुलगी मुलांना आवडत नाही.

Little girl Happiness to burst the bubble wrap
VIRAL VIDEO : ‘बबल रॅप म्हणजे प्रेम!’ चिमुकलीचा उत्साह पाहून नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स; म्हणाले, ‘आम्हीसुद्धा लहानपणी…’
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
good habits to kids | Manners for Kids | good manners for children
मुलांना चांगले शिक्षणच नाही तर संस्कारही महत्त्वाचे; त्यांना लहानपणापासूनच शिकवा ‘या’ ७ चांगल्या सवयी
Loksatta lokrang A collection of poems depicting the emotions of children
मुलांचं भावविश्व टिपणाऱ्या कविता
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
student could not bear stress of studying she became depressed and left home
मुलं मुली असे का वागतात? नैराश्य, अभ्यासाचा ताण, चिंता, घर सोडणे…
Childrens day 2024 | childhood days never come back
Children’s day 2024 : बालपणीचे दिवस परत कधीही येत नाही! VIDEO पाहून आठवेल तुम्हाला तुमचे बालपण

खायला लाजणे : पार्टीत किंवा डेटवर खाण्यासाठी काही मुली लाजतात. मुलींची खायला लाजण्याची सवय पुरुषांना आवडत नाही.

संशय घेणे: चांगल्या नात्यातला मीठाचा खडा टाकणारी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संशय. संशय घेतल्यामुळे अनेक लोकांचे संसार उद्धवस्त झाल्याची अनेक उदाहरणं आपण पाहिली असतील. मुलांना प्रत्येक गोष्टीत संशय व्यक्त करणाऱ्या मुली अजिबात आवडत नाहीत. याशिवाय थोडथोड्या गोष्टींवर अ‍ॅटिट्यूड दाखविणाऱ्या मुलींपासूनही मुले चार हात लांब राहणेच पसंत करतात. या गोष्टीचा मुलींनी अधिक विचार करावा.

शुल्लक गोष्टीवरून भांडणे: रिलेशनमध्ये थोडीफार भांडण-तंटे सामान्य गोष्ट आहे. मात्र ही गोड भांडणे एका मर्यादेत राहिली तर ठिक आहे. बऱ्याच मुली अगदी शुल्लक गोष्टींवरदेखील खूप संताप व्यक्त करतात. हीच गोष्ट बऱ्याच मुलींना आवडत नाही. कारण वाद विकोपाला नेणारी मुलगी मुलांना आवडत नाही.

मुलांवर बंधने आणणाऱ्या मुली: बऱ्याचदा रिलेशनशीपमध्ये मुली मुलांवर बंधन लादण्यास सुरूवात करतात. त्यांच्या सवयी बदलण्याचा प्रयत्न करतात. त्यांचं स्वातंत्र्य अप्रत्यक्षपणे हिरावण्याचा ते प्रयत्न करत असतात. त्यांनी कुणाशी बोलावं, कधी हसावं, कधी गप्पा माराव्यात अशा बऱ्याच गोष्टींवर ते मुलांवर बंधने आणतात. त्यातच जर तो एखाद्या अन्य मुलीशी गप्पा मारत असेल तर ही गोष्ट तिला अजून जास्त खटकते आणि त्याच्याशी अबोला धरते. अशा मुलीही मुलांना आवडत नाहीत.

अती करणाऱ्या मुली: ज्या मुलींसाठी फक्त पैसा सर्वकाही आहे, अशा मुलींपासून मुले नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करतात. शिवाय प्रमाणापेक्षा जास्त परंपरांना मानणाऱ्या मुली देखील मुलांना बोर करतात.